Home मुंबई वाघाचे पांघरून घेतल्यावर वाघासारखे दिसता येते, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही...

वाघाचे पांघरून घेतल्यावर वाघासारखे दिसता येते, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही ! संभाजीराजे छत्रपतींची शिवसेनेवर टीका!

141

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220611-WA0049.jpg

वाघाचे पांघरून घेतल्यावर वाघासारखे दिसता येते, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही ! संभाजीराजे छत्रपतींची शिवसेनेवर टीका!

मुंबई ( अंकुश पवार,जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्यूज चॅनल)

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून दावा सांगितला होता. मात्र शिवसेना व संजय राऊत यांनी ताठर भूमिका घेत त्यांना पाठिंबा देण्याचे नाकारून पक्षाचा उमेदवार उभा केला.
संजय राऊत यांनी तर आमची ४२ मते आम्ही अपक्ष उमेदवाराला का देऊ? असा थेट सवाल करत पाठिंबा हवा असेल तर पक्षात प्रवेश करा, अशी अट संभाजीराजे यांना घातली होती. पण आज लागलेल्या निकालाने शिवसेना व संजय राऊत यांचा हा ४२ मतांचा फुगा फुटला आहे.
जी मते सेनेकडे मुळात नव्हतीच, त्या मतांसाठी शिवसेना छत्रपती संभाजीराजे यांच्यावर अटी लादत होती हे आता निकालांनंतर स्पष्ट होऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी आज केलेले ट्वीट चर्चेचा विषय ठरले आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग संभाजीराजे यांनी ट्वीट करत आपल्या भावना मांडलेल्या आहेत…
वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ll
तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ll
म्हणजेच, “वाघाचे पांघरून घेतल्यावर वाघासारखे दिसता येते, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही. पण असा खोटा आव आणणाऱ्याची लगेचच फजिती होते”.

Previous articleधानो-यात घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती।
Next articleअकोला जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.