Home गडचिरोली धानो-यात घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती।

धानो-यात घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती।

45
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220611-WA0044.jpg

धानो-यात घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती।

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरा चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):धानोरा येथील भवरागड रेती घाटावर घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटपाचा शुभारंभ मंडल अधिकारी सरपे यांच्या हस्ते करण्यात आला.जिल्हात कोणत्याच रेती घाटाचे लिलाव न झाले नाही.परिणामी घरकूल लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी रेती मिळत नसल्याने खुप अडचण जात होती.त्यामुळे रेतीसाठी घरकुल लाभार्थ्यांनी शासनाकडे रेती मिळावी म्हणून मागणी केली होती.हि मागणी मान्य झाल्याने घरकूल लाभार्थ्यांना रेती मिळणे सोयीचे झाले आहे.

शासनाने आदेश काढुन प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती मोफत देण्याचे ठरवले, त्यानुसार धानोरा येथे भवरागड रेती घाटावर मोफत रेतीची सोय करण्यात आली आहे.घरकुल लाभार्थ्यांनी आपले घरकुल बांधकामाचे आदेश पञ, आधार कार्ड , व रेती वाहुण नेण्यासाठी ट्रँक्टर रेती घाटावर आणने आवश्यक आहे.घरकुल लाभार्थ्यांनी मोफत रेतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महसुल विभागाद्वारे करण्यात आले आहे.यावेळी तलाठी अविनाश कोडाप,कोतवाल नरेश हारामी ,मारोती पदा,गावातील नागरीक तसेच घरकुल लाभार्थ्यांना उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here