Home मुंबई सोनिया गांधी आणि राहुल गांधींना हाजिर हो..! नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीने पाठविले...

सोनिया गांधी आणि राहुल गांधींना हाजिर हो..! नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीने पाठविले समन्स

153

आशाताई बच्छाव

IMG-20220602-WA0009.jpg

सोनिया गांधी आणि राहुल गांधींना हाजिर हो..! नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीने पाठविले समन्स

मुंबई (अंकुश पवार, मुंबई जिल्हा प्रतिनीधी,युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीने आज सोनिया गांधी आणि राहुल गांधींना समन्स पाठवले असून सोनिया यांना ८ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलंय. शिर्डी येथे काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरात पत्रकारांशी बोलताना थोरात यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.
केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना नामोहरम करण्याचे काम भाजपा सरकार करत आहे. देशात जातीय व धार्मिक तेढ निर्माण करून लोकशाहीवर आघात त्यांनी सुरू केला आहे.
देशात हुकूमशाही व एकाधिकारशाही वाढवणाऱ्या भाजपा सरकारने सातत्याने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांना दिलेली ईडीची नोटीस ही लोकशाहीची चिंता वाढवणारी असून संपूर्ण देशातील जनता व काँग्रेसजन हे सोनिया गांधींच्या पाठीशी आहेत, असं मत विधिमंडळ पक्षनेते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलंय.
“ नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी व राहुल गांधी यांना दिलेल्या ईडीच्या नोटीस अत्यंत दुर्देवी असून लोकशाहीची चिंता वाढवणारी आहे. भाजपा सरकारकडून सातत्याने लोकशाहीवर आघात होत आहे. हे देशाच्या दृष्टीने चांगले नाही,” असं म्हणत थोरात यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिलीय.
“या प्रकरणी संपूर्ण देशातील जनता आणि काँग्रेसजन हे सोनिया गांधी यांच्या पाठीशी खंबीर उभी असून भाजपाच्या या चुकीच्या दडपशाहीमुळे देशातील जनतेमध्ये प्रचंड रोष व असंतोष निर्माण झालाय,” असंही थोरात म्हणाले. यावेळी थोरातांसमवेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रवक्ते अतुल लोंढे, डॉ. सचिन सावंत, आशिष दुवा आदी उपस्थित होते.
तर या पत्रकार परिषदेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “उदयपूर संकल्प शिबिरातील अर्थकारणाच्या गटातून मोदी सरकारच्या सध्याच्या धोरणांवर तीव्र विरोध करण्यात आला आहे. सार्वजनिक कंपन्यांच्या काही भांडवलदारांना कवडीमोल किंमतीत विक्री, राज्यांच्या अधिकारावर गदा, या मुद्द्यांबरोबर भविष्यातील आधुनिक तंत्रज्ञान चे मनुष्यबळ तयार करावे लागणार आहेत. १९९० चे आर्थिक बदलानंतर टेलिकॉम व पेट्रोल या क्षेत्रातील सत्ता काही उद्योजकांच्या हाती गेली आहे.

Previous articleसर्व राजकीय पक्ष्यांना बंडखोरांना खुश करण्यासाठी करावी लागणार तारेवरची कसरत..?
Next articleहणेगाव येथे कृषी सेवा केंद्राचा मनमानी कारभार, खते , बियाणे विक्रीवर नियंत्रणाची गरज
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.