Home नांदेड हणेगाव येथे कृषी सेवा केंद्राचा मनमानी कारभार, खते , बियाणे विक्रीवर नियंत्रणाची...

हणेगाव येथे कृषी सेवा केंद्राचा मनमानी कारभार, खते , बियाणे विक्रीवर नियंत्रणाची गरज

122

आशाताई बच्छाव

IMG-20220602-WA0033.jpg

हणेगाव येथे कृषी सेवा केंद्राचा मनमानी कारभार, खते , बियाणे विक्रीवर नियंत्रणाची गरज

चढ्या दराने खते – बियाणांची विक्री ; कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

हवमान खात्याच्या अंदाजानुसार अवघ्या काही दिवसांत मान्सून दाखल होत असल्याचा इशारा मिळाला आहे.खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असुन शेतकऱ्यांनी पेरणीची पुर्व तयारी केली आहे. शेतकऱ्यांकडून खते बियाणे ची मागणी वाढत आहे.देगलूर तालुक्यातील हणेगाव येथील कृषी केद्रांकडुन जादा दराने बियाणांची विक्री करुन शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन खते- बियाणावर नियंत्रण ठेवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. हणेगाव येथील कृषी सेवा केंद्रावर खते व बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची रेलचेल दिसून येत आहे. शेतकऱ्यांचा मुख्य हंगाम असलेला खरीप हंगाम हा जून महिना ते नोव्हेंबर महिना या कालावधीत असतो. या हंगामाची खरी सुरुवात जून महिन्यातील 15 तारखेपासून होते. कारण या कालावधीत मान्सून पूर्णत: सक्रिय झालेला असतो तसेच दमदार पाऊस पडतो म्हणून या वेळेपासून शेतकरी जमिनीमध्ये ैलांच्या साहाय्याने किंवा ट्रॅक्‍टरच्या साह्याने पेरणी भौतिक भागानुसार पोषक वातावरणाचा अंदाज घेऊन ज्या क्षेत्रात जी पिके घेतली जातात त्यामध्ये गळीत धान्य व कडधान्य यामधील मूग उडीद सोयाबीन तूर आधी सारख्या वाणांची पेरणी करीत असतो या पेरणी बरोबर शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात. त्याकरिता बियाणे खरेदी करण्याबरोबरच रासायनिक खतांची मागणी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात केली जाते. यावेळी बियाणे व खते शासनाने ठरवून दिलेल्या भावापेक्षा जास्त दराने विक्री करण्यात येतात. यंदा DAP खतांची मुळ किंमत यंदा १ हजार ३५० एवढी आहे तर सध्या हणेगावात १हजार ५०० ते १ हजार ६०० ने विक्री सुरू आहे.तर एका पोत्यामागे २०० ते ३०० रुपये अधिकचे आकारले जात आहेत.देगलूर कृषीविभागाच्या आशीर्वादानेच हणेगाव येथील खते विक्रेत्यांची मनमानी वाढत असल्याची शेतकऱ्यांतून चर्चा पाहवयास मिळत आहे. सध्या शेतीची कामे आटोपून शेतकऱ्यांनी खते व बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगभग सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.यासाठी काही आर्थिक बाजुनी कमी असलेले शेतकरी खरीपाच्या पेरणी साठी कर्ज काढून किंवा आपल्याकडील मालमत्ता गहाण ठेवून रासायनिक खते बियाणे खरेदीसाठी बाजारात शेतकरी दाखल होत आहेत.तर हणेगाव येथील खते विक्रेत्यांनी मनमानी भाव लावून खते बियाण्यांचे विक्री करीत असल्याची चर्चा शेतकऱ्यांतून होत आहे.संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन हणेगाव येथील खते व बियाणे विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवण्याची शेतकऱ्यांतून मागणी होत आहे.

Previous articleसोनिया गांधी आणि राहुल गांधींना हाजिर हो..! नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीने पाठविले समन्स
Next articleक्रुरतेचा कळस : निर्दयी आईने पोटच्या २ चिमुल्या लेकरांची हत्त्या करुन शव जाळले
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.