Home अकोला तेल्हारा ग्राम बाल संरक्षण समिती प्रशिक्षण कार्यशाळेत 113 अंगणवाडी सेविका व 22...

तेल्हारा ग्राम बाल संरक्षण समिती प्रशिक्षण कार्यशाळेत 113 अंगणवाडी सेविका व 22 पोलीस पाटील यांचा सहभाग

70
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220527-WA0029.jpg

तेल्हारा ग्राम बाल संरक्षण समिती प्रशिक्षण कार्यशाळेत
113 अंगणवाडी सेविका व 22 पोलीस पाटील यांचा सहभाग

अकोला,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : तेल्हारा तहसील कार्यालयाच्या सभागृहांमध्ये (शुक्रवार दि.20 रोजी) जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तेल्हारा तालुक्यामधील गाम बाल संरक्षण समितीच्या सदस्य सचिव अंगणवाडी सेवीका व सदस्य पोलीस पाटील याचे प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळे मध्ये 113 अंगणवाडी सेवीका व 22 पोलीस पाटील यांनी प्रशिक्षण घेतले.

ग्राम बाल संरक्षण समित्या अधिक सक्षम व्हाव्यात, या करीता गाम बाल संरक्षण समितीची भुमिका,रचना व कार्य तसेच कायद्यांची माहिती व्हावी यासाठी तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे.
तेल्हारा तालुका प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाटन तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बालन्याय मंडळ सदस्य अॅड. वैशाली गावंडे, नायब तहसीलदार गुरव उपस्थित होते.

या कार्यशाळे मध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनिल लाडुलकर, तालुका संरक्षण अधिकारी सुनिल सरकटे, अतुल चव्हाण, नितीन अहीर,सतिश राठोड, संगिता अभ्यंकर यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे संचालन सतिश राठोड यांनी तर आभार प्रदर्शन रेश्मा गुरूमकार यांनी केले. यावेळी सचिन घाटे, योगेंद्र खंडारे, रेवत खाडे, अजय पोहनकर, अमोल तळोकार, सुनिता गावत्रे, सुरेखा शेगोकार यांचे सहकार्य लाभले.

Previous articleसखीःवन स्टॉप सेंटर’ सुविधेची माहिती अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी निमा अरोरा
Next articleशेतकरी कर्जमाफीबाबत मोठी बातमी, ‘या’ महिन्यात मिळणार प्रोत्साहनपर अनुदान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here