• Home
  • पुण्याहुन परतलेल्या दाम्पत्याला घरच्यांनी नाकारले

पुण्याहुन परतलेल्या दाम्पत्याला घरच्यांनी नाकारले

⭕ पुण्याहुन परतलेल्या दाम्पत्याला घरच्यांनी नाकारले ⭕
नांदेड : ( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

बिलोली (जि. नांदेड) : लॉकडाऊनमुळे बिलोली तालुक्यातील कोल्हेबोरगाव येथील दाम्पत्य पुणे येथून गावात परतले. मात्र, त्यांना घेण्यासाठी घरच्यांनी नकार दिला. गावकऱ्यांनीही तिरस्कार केला. पिण्यासाठी पाणीही दिले नाही, असा भीषण प्रसंग त्यांच्यावर ओढवला.

व्यवसायानिमित्त हे दाम्पत्य पुणे येथे राहावयास गेले होते. तथापि, कोरोनामुळे गावाची ओढ त्यांना लागली. १८ मे रोजी हे दाम्पत्य कोल्हेबोरगाव येथे आले. त्यावेळी कटू प्रसंगाना तोंड द्यावे लागले. आपल्या संसाराचे गाठोड डोक्यावर घेऊन पत्नीसह तब्बल तीन तास त्यांना रखरखत्या उन्हात ताटकळत उन्हात उभे राहावे , भुकेने व्याकूळ, तहानेने त्रासून गेलेल्या या दाम्पत्याच्या मदतीला ना रक्ताची नाती कामी आली, ना प्रशासन. घरच्या मंडळींसह ग्रामस्थांनी नाकारल्याने तरुण दाम्पत्याने कंधार तालुक्यातील रुई गावच्या माळरानात छोटी झोपडी टाकून तात्पुरता आधार घेतला आहे. उपाशीपोटी दिवस काढण्याची वेळ आमच्यावर आली असून आयुष्यात कधीच न विसरणारा हा प्रसंग असल्याची प्रतिक्रिया दाम्पत्याने दिली. बिलोली तालुका प्रशासनाने जिल्हाबाहेरुन आलेल्या मजुरांसाठी शाळा, समाजमंदिर व गावाबाहेर क्वारंटाईन करुन ग्रामस्तरावर देखरेख समिती स्थापन केल्याचे सांगून स्वत:चा उदो-उदो करुन घेतला खरा. प्रत्यक्षात कोल्हे बोरगाव येथे असे काहीच नसल्याचे भयावह चित्र या दाम्पत्यामुळे समोर आले. या दाम्पत्याला प्रशासनाने न्याय मिळवून देण्याची मागणी आता होत आहे.

anews Banner

Leave A Comment