Home गडचिरोली गुरवळा नेचर सफारी क्षेञातुन होणारी अवजड वाहतुक थांबवावी।

गुरवळा नेचर सफारी क्षेञातुन होणारी अवजड वाहतुक थांबवावी।

25
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220524-WA0023.jpg

गुरवळा नेचर सफारी क्षेञातुन होणारी अवजड वाहतुक थांबवावी।
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): वनविभागाच्यावतिने सुरु करण्यात आलेल्या गुरवळा नेचर सफारी क्षेञातुन तसेच वैरागड- कुरखेडा मार्गे जंगलातुन होणार्या अवजड वाहतुक थांबवावी अशी मागणी गडचिरोली येथिल वनप्रेमी प्रमेय उराडे यांनी वनसंरक्षक यांच्याकडे निवेदनातुन केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव असलेल्या गुरवळा नेचर सफारी येथुन जाणाऱ्या रस्त्यावरुन म्हणजे गडचिरोली ते पोटेगांव मार्ग, वैरागड- कुरखेडा मार्ग,आरमोरी वडसा मार्गावरुन मोठ्या व अवजड वाहनांची वाहतुक बंद केली गेली पाहीजे. कारण हे मार्ग व ठिकाण घनदाट जंगलाने व्यापलेले आहे व तेथिल जंगलात विविध प्रकारचे तृणभक्षी प्राण्याचें वास्तव्य आहे.अन्य पाण्याच्या शोधात वनजीवन एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी ये- जा करित असतात व बहुतेकदा रस्ते सुध्दा ओलांडत असतात
नमुद केलेल्या जंगलातुन जे रस्ते गेले आहेत.तेथुन मोठ्या व अवजड वाहनाची वाहतुक होत असते.अपघात हऊन वन्य प्राणी व मानवी जिवन सुध्दा दगावु शकतात यामुळे गडचिरोली ते पोटेगांव मार्गे,ठाणेगाव- वैरागड- कुरखेडा दैवरी मार्ग, आरमोरी – वडसा मार्गे अवजड व मोठ्या वाहनानां वाहतुकिसाठी बंदि घालण्यात यावी.व त्यांना वाहतुकिसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्यात यावा अशीही मागणी प्रमेय उराडे यांनी केली आहे.

Previous articleखांदला राजाराम येथे नक्षली पञके आढळली। येथील ग्रा.पंचायत व पेसा समिती 17.50 लक्ष रुपये हडप केल्याचा आरोप.
Next articleमहागाईच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे चौकात धरणे आंदोलन।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here