Home गडचिरोली मा.उध्दव जी एक लिटर पेट्रोल वर 32 रुपये जनते कडुन घेता 12...

मा.उध्दव जी एक लिटर पेट्रोल वर 32 रुपये जनते कडुन घेता 12 रुपये कमी करा। प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस

137
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220522-WA0042.jpg

मा.उध्दव जी एक लिटर पेट्रोल वर 32 रुपये जनते कडुन घेता 12 रुपये कमी करा।
प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस                                               गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरी चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
देशात,राज्यात माहागाई वाढण्याचे जे अनेक कारने आहेत त्यात पेट्रोल डिझेल ची दरवाढ हे मुख्य कारन आहे.माहागाईला लगाम लावण्या करीता सरकार पर्यंत करतच असते कारण आपल्या देशात कांद्याचे भाव वाढल्याने सरकारे कोसळली आहेत
दर 100 वर्षांनी येत असलेली जागतीक महामारी म्हणजे कोरोना दोन वर्षा पुर्वि आली ते कमी जास्त प्रमाणात जगात व भारतात अजुनही आहे.पुढे कीती दिवस राहतो हे पण माहित नाही.या जागतीक महामारी मुळे जगाचेच फार नुकसान झाले.भारताचे पण नुकसान झाले.बाजुचे श्रीलंका,पाकिस्तान,बंगालादेश पार कोलमडुन गेले.या काळात मा.नरेंद्रजी मोदी मा.प्रधानमंत्री यानी 80 करोड गरीबांना अन्नधान्याचे वाटप केले.190 करोड जनतेला मोफत कोरोना लस दिली.11.5 करोड शेतक-यांना 1,50,000 करोड निधी वार्षिक 6 हजार प्रमाणे दिला.याच 80 करोड गरीबांना 500,1000 रुपये पण बॅंक खात्यात जमा केले.हे सर्व करताना भारत पुर्ण लाकडाउन मध्ये असल्याने आवक पण देशाची नाहि चे बरोबर होती
लाकडाउन नंतर जग आणी देश पटरीवर येउ लागला माहागाई पण वाढु लागली ओपेक ने डिझेल,पेट्रोल च्या किंमती पण वाढविल्या यातुन मार्ग काळत भारत सरकारने पेट्रोल डिझेल दर कमी केले.भारत सरकर पेक्षा राज्य सरकार चे कर जास्त असल्याने राज्यानी पण दर कमी करावे असे भारत सरकारला व देशातील 136 करोड जनतेला वाटले.परत 21 मे ला भारत सरकारने पेट्रोल 9.5 रुपये व डिझेल 7 रुपये स्वस्त केले.यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण प्रतिक्रिया दिली
माहागाई कमी करुन जनतेला आधार देने भारत सरकार व राज्य सरकार चे काम आहे.भारत सरकारने दोनदा पेट्रोल डिझेल कमी केले आता तरी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल डिझेल चे दर कमी करावेत.कारण महाराष्ट्र दर लिटर पेट्रोल मागे जनते कडुन 32 रुपये वसुल करते.उत्तर प्रदेश 15.50 रुपये. आंध्र प्रदेश 31.59 रुपये. उत्तराखंड 14.51 रुपये. राजस्थान 29.10 रूपये. गुजरात 16.50 रुपये. केरड 27.24 रुपये.हिमाचल प्रदेश 16.60 रुपये वसुल करते.जर भाजपा शासीत राज्य कमी कर आकारत असुन सुध्दा दर कमी करत असतील तर भारतात सर्वाधिक पैसे जनते कडुन वसुल करना-या महाराष्ट्र सरकारला हे का जमत नाहि.की महाराष्ट्र जनतेला दिलासा द्योतक नाहि महाविकास आघाडी सरकारला हा प्रश्न जनतेच्या मनात येतो
सध्या राज्य सरकारला वॅट करा पोटि 24884 कोटी पैसा जमा झाला आहे.महाराष्ट्रातील जनता विचारते आहे मा.उध्दव जी ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र आपण कधि पेट्रोल डिझेल दर कमी करता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here