Home गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने कमलापूर, पातानील येथील हत्तींचे स्थलांतरन रोखण्याकरीता गांधीगिरी मार्गाने ठिय्या...

जिल्हा काँग्रेसच्या वतीने कमलापूर, पातानील येथील हत्तींचे स्थलांतरन रोखण्याकरीता गांधीगिरी मार्गाने ठिय्या आंदोलन. आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि मुख्यमंत्राचे हत्ती कॅम्प कडे वेधले लक्ष.

49
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220520-WA0021.jpg

जिल्हा काँग्रेसच्या वतीने कमलापूर, पातानील येथील हत्तींचे स्थलांतरन रोखण्याकरीता गांधीगिरी मार्गाने ठिय्या आंदोलन.

आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि मुख्यमंत्राचे हत्ती कॅम्प कडे वेधले लक्ष.

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):: राज्यातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प असलेल्या कमलापूर व पातानील येथील हत्तींच्या स्थलांतराला वेग आलेला असून जिल्ह्यातील एकमात्र हत्ती कॅम्प वाचवण्याकरिता व केंद्र सरकार आणि मा. मुख्यमंत्री महोदयांचे याकडे लक्ष वेधण्याकरिता जिल्हा काँग्रेस च्या वतीने कमलापूर येथे 20 मे 2022 रोजी गांधीगिरी मार्गाने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वाखालीएक दिवशीय ठिय्या आंदोलन करण्यात आले.
कमलापूर व पातानील येथील हत्ती कॅम्प हे जिल्ह्याचा वैभव आहे. अनेक वर्षांपासून त्यांचे इथे वास्तव्य आहे त्यांच्या मुळे आजपर्यंत कुठल्याही मानवास हानी झाल्याचे दिसून येत नाही शिवाय या हत्तींच्या वास्तव्याने कमलापूर ला नवी ओळख मिळाली आहे त्यामुळे येथील हत्तीचे स्थलांतरन करून हे हत्ती  जामनगर (गुजरात) येथील खाजगी प्राणी संग्रहालयात नेने ही बाब योग्य नाही. त्यामुळे ह्याचा काँग्रेसच्या वतीने सर्वत्र निषेध करून कमलापूर वाचवन्यासाठी आंदोलन करण्यात गांधीजींच्या मार्गावर चालत आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला काँग्रेस अध्यक्ष रुपाली पंदिलवार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लॉरेन्स गेडाम, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, रोजगार स्वयंम रोजगार सेल जिल्हाध्यक्ष दामदेव मंडलवार, विमुक्त भ.जाती जमाती चे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण, जिल्हा सचिव सुनील चडगूलवार, एटापल्ली ता.अध्यक्ष संजय चरडूके, नगरसेवक निजाम पेंदाम, मोहन नामेवार, आकाश परसा, अक्षय भोवते, हरबाजी मोरे, संजय चन्ने, वसंत राऊत, प्रभाकर कुबडे, जितेंद्र मूनघाटे, अंकुश गाढवे, सुधीर बांबोले, रजाक खान,किसन हिचमी, मनोहर बोरकर, अमर गाढवे, संतोष मडावी, नागाजी कोरत, रामेश्वर, देवानंद गावडे, तानाजी दुर्वा, लालसू, भुजनगराव तोडसाम, रंगा गावडे, रवी कुमरे, चरणदास गावडे, विठ्ठल तोडसाम, माधव पोटावी, लकमु गावडे, मुटयालू गावडे, सुरेखा कामसे, फुलाबाई मडावी, कमलाबाई मडावी यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here