Home पुणे मातंग एकता आंदोलन पिंपरी चिंचवड शहर व ओबीसी सेल च्यावतीने स्व.भारतरत्न मा.पंतप्रधान...

मातंग एकता आंदोलन पिंपरी चिंचवड शहर व ओबीसी सेल च्यावतीने स्व.भारतरत्न मा.पंतप्रधान राजीव गांधी यांचा स्मृती दिन साजरा.

170

राजेंद्र पाटील राऊत

मातंग एकता आंदोलन पिंपरी चिंचवड शहर व ओबीसी सेल च्यावतीने स्व.भारतरत्न मा.पंतप्रधान राजीव गांधी यांचा स्मृती दिन साजरा.
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
दापोडी मध्ये भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी स्वर्गीय भारतरत्न राजीव गांधी यांच्या प्रतिमेस सचिन साठे (महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव व राधिका ताई अडागळे (अध्यक्ष मातंग एकता अंदोलन पि.चि.शहर महिला आघाडी) युवराज गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना आज राजीव गांधी असते खरोखरच ते खूप खुश असते कारण की त्यांच्यामुळे आज संगणक आपल्या देशांमध्ये आणून प्रत्येक भारतीयाच्या हातामध्ये आज मोबाईल आला आहे आणि या मोबाइलमुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस जाऊ शकतो असे महान भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांना खरोखरच सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहणे खूप गरज आहे असे मनोगत सचिन साठे व्यक्त केले.यावेळी कुंदन कसबे,नितीन कांबळे, सोमनाथ गायकवाड,राजुभाऊ वाळुंजकर (पिंचिं ब्लॉक कमिटी अध्यक्ष ) भाऊसाहेब पठारे,रामभाऊ औताडे, विशाल कड,योगेश बहिरट आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र बाईत यांनी केले.

Previous articleकुळे गावातील ऐतिहासिक सलग साठ वर्ष चालत आलेल्या संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या आनंद उत्साहात पार पडला.
Next articleमहावितरणा कंपनीचा मनमानीकारभार विजेचा वारंवार लपंडाव
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.