Home उतर महाराष्ट्र शिंदखेडा येथे देशाचे नेते आदरणीय खा, शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य...

शिंदखेडा येथे देशाचे नेते आदरणीय खा, शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या केतकी चितळे नामक महीलेच्या प्रतीमेस जोडे मारून गुन्हा दाखल करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले

88
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220516-WA0022.jpg

शिंदखेडा येथे देशाचे नेते आदरणीय खा, शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या केतकी चितळे नामक महीलेच्या प्रतीमेस जोडे मारून गुन्हा दाखल करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले

वासखेडी,(दिपक जाधव युवा मराठा आँनलाईन न्युज नेटवर्क) – आज रोजी शिंदखेडा येथे राष्ट्रीय नेते पद्मविभूषण आदरणीय खा,शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर केतकी चितळे नामक महिलेने ट्विटर,फेसबुक,यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या लिखित संग्रहाचा छेडछाड करत एक कविता पोस्ट करून आदरणीय, पवार साहेबांचा ज्यांची राजकिय व समाजकारणात लोकनेते म्हणुन संपुर्ण ह्यात देशाच्या व राज्याच्या जडणघडणीत ,कृषी,सहकार,उद्योग,शिक्षण,सिंचन व महिला धोरण अशा अनेक क्षेत्रात मोलाचे योगदान आहे,महाराष्ट्राला विविध क्षेत्रात गती देऊन लोकविकासाचे ज्यांनी सातत्याने काम केले आहे,अनेक धोरणात्मक निर्णयामध्ये देशाला पॅटर्न देणारे महाराष्ट्र राज्य ज्याच्यामुळे ठरले ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर विकृत विडंबन केतकी चितळे या महीलेने स:ताच्या ट्विटर व फेसबुक हॅन्डल वरून केलेले आहे, सदर महीलेने केलेल्या पोस्टद्वारे आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारे जनता,कार्यकर्ते,पदाधिकारी, शेतकरी,यांच्यामध्ये तसेच उपहासात्मक कवितेमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा नामोल्लेख तसेच त्यांच्या साहीत्याशी छेडछाड करून वारकरी संप्रदायामध्ये देखील नाराजीची भावना निर्माण झाल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे,
केतकी चितळे सारख्या विकृत माथेफिरूंनी भविष्यात अशा प्रकारच्या गोष्टी करू नये याकरिता तिचे फेसबुक ट्विटर ,इंस्टाग्राम आदी सर्व हॅडल /पेज आपण कायमस्वरूपी बंद करावे अशी मागणी करत आहोत,या आधीदेखील या महीलेने खालच्या पातळीवर जाऊन समाजमनाच्या भावना दु:खावतील अशा वादग्रस्त पोस्ट स्वत:च्या सोशल मीडिया माध्यमातुन केलेल्या आहेत,असे काहीतरी विधान करून सतत प्रसिद्धि मिळवायची आणि त्या माध्यमातुन आपले हित साध्य करून घ्यायचे असा घाणेरडा व गलिच्छ हेतु ठेऊन केतकी चितळे अशा प्रकारच्या पोस्ट कायम शेअर करीत असते ,आमची आपणांस कळकळीची विनंती आहे, कि तिच्यावर गंभीर गुन्हा दाखल करून अटक करावी ,जेणेकरुन भविष्यात तिने अथवा कोणीही अशा प्रकारच्या पोस्ट शेअर करतांना शंभर वेळा विचार करावा,त्याच प्रमाणे केतकी चितळे हिचे मानसिक संतुलन व्यवस्थित आहे,की नाही हे देखील तपासुन तिला योग्य उपचार देण्यात यावा,अशी प्रवृत्ती समाजाला घातक आहे,
आज शिंदखेडा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौफुलीवर केतकी चितळे च्या प्रतीमेस जोडे मारून निषेध नोंदविला व शिंदखेडा पोलीस ठाण्यात केतकी चितळे विरूध्द भारतीय दंड संहिता कलम ५०५(२),५००,५०२,५०६,५०१,५०७,१५३,व आयटी अँक्ट नुसार गुन्हा नोंदवावा व अशा प्रवृत्तींना आळा बसवावा ,ही विनंती पोलीस निरीक्षक श्री,सुनिल भाबड यांना करण्यांत आली,यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझी जिल्हाध्यक्ष श्री,संदीपदादा बेडसे,महीला जिल्हाध्यक्षा ज्योतीताई पावरा,शिंदखेडा तालुकाध्यक्ष डॉ, कैलास ठाकरे,ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक जगताप,युवक जिल्हाध्यक्ष मयुर बोरसे,शहराध्यक्ष प्रविण पाटील, महीला तालुका अध्यक्षा ज्योती मराठे,युवक तालुकाध्यक्ष चिराग माळी,दोंडाईचा शहर कार्याध्यक्ष दयाराम कुवर,मोती बापु,तालुका उपाध्यक्ष आनंदराव पाटील, लोहगांव सरपंच महेन्द्र पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख दुर्गेश‌ पाटील, ग्रंथों,सेलचे शहराध्यक्ष हर्षदिप वेंदे,देविदास मोरे,राजेंद्र पाटील,डॉ, संजय पाटील, चंदु पाटील, योगेश पाटील, यश आखाडे,विक्की पाटील, आदी कार्यकर्त्याच्या निवेदनावर सह्या आहेत ,तसेच राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here