Home नांदेड जेष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख यांच्या जन्मदिनी नायगांवात सामाजिक उपक्रम.

जेष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख यांच्या जन्मदिनी नायगांवात सामाजिक उपक्रम.

96
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220513-WA0018.jpg

जेष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख यांच्या जन्मदिनी नायगांवात सामाजिक उपक्रम.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नायगांव बा.-
पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक,मराठी पञकार परिषदेचे मुख्य विश्वस्त व पत्रकारांचे लढवय्ये नेतृत्व एस.एम.देशमुख सर यांच्या जन्मदिनानिमित्ताने आज नायगांव तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
एस.एम.देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणेच यंदाही मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी,
विभागीय सचिव प्रकाश कांबळे,नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष ॲड.प्रदिप नागापूरकर,जिल्हा कार्याध्यक्ष गोवर्धन बियाणी,माजी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर व जिल्हा उपाध्यक्ष तथा,तालुका प्रभारी लक्ष्मणराव मा.भवरे,माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर लखपञेवार व तालुकाध्यक्ष गजानन चौधरी, तालुका सरचिटणीस दिलीप वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.१३ मे रोजी नायगांव तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.त्या अंतर्गत ग्रामीण रुग्णालय, नायगांव (बा.) येथे रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर,जिल्हा उपाध्यक्ष व तालुका प्रभारी लक्ष्मणराव मा.भवरे,तालुकाध्यक्ष गजानन चौधरी तसेच,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.आर.एन.पोहरे यांच्यासह एस.एन.शिंदे,एस.एन.माडेवार,
वडजे,एस.वाघमारे आदी ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी व मान्यवर प्रमुख उपस्थितीत होते.
नायगांव तालुका मराठी पञकार संघाचे तालुका सहसचिव रामप्रसाद चन्नावार यांनी या सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी माजी तालुका सरचिटणीस पंडित वाघमारे, तालुका उपाध्यक्ष गंगाधर गंगासागरे,मधुकर जवळे,सहदेव तुरटवाड,प्रकाश महिपाळे, किरण वाघमारे आदींसह नायगांव तालुका मराठी पत्रकार संघाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी व पञकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here