Home पुणे रेल्वे हद्दीतील बांधकाम धारकांचे अतिक्रमण थांबविण्यासंदर्भात आम्ही सकारात्मक…..पण – रेणू शर्मा

रेल्वे हद्दीतील बांधकाम धारकांचे अतिक्रमण थांबविण्यासंदर्भात आम्ही सकारात्मक…..पण – रेणू शर्मा

43
0

राजेंद्र पाटील राऊत

रेल्वे हद्दीतील बांधकाम धारकांचे अतिक्रमण थांबविण्यासंदर्भात आम्ही सकारात्मक…..पण
– रेणू शर्मा
पिंपरी- चिंचवड उमेश. पाटील
आनंदवनवस्ती फुगेवाडी,दापोडी रेल्वेलाईन हद्दीलगत असणाऱ्या बांधकाम झोपडपट्टी धारकांना जागा रिकामी करण्या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडून नोटीस देण्यात आल्या असून स्थानिक महानगरपालिका प्रशासन व राज्य सरकारकडून पुनर्वसन करून मिळेपर्यंत अतिक्रमण कारवाई न करण्याचे संदर्भात व व दापोडी येथील रेल्वेगेट येते हलक्‍या गतीच्या वाहनांसाठी उड्डाणपूल करण्याबाबत भाजपा शहर सचिव व रेल्वे सल्लागार समिती सदस्य विशाल वाळुंजकर यांनी पुणे डिव्हिजन रेल्वे मॅनेजर रेणू शर्मा यांच्याकडे मागणी करण्यात आली…!
याबाबत स्थानिक महापालिका प्रशासन व राज्य शासना ला नोटिसा देऊन व स्थानिक प्रशासन व राज्य सरकार यांच्या संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेण्यात यावे रेल्वे हद्दतील नागरिक सर्वसामान्य , गरीब असून अचानक पणे होणारी कारवाई ही अन्यायकारक असेल तसेच दापोडी रेल्वे स्टेशन येते सांगवी ,पिंपळे गुरव,काटे पिंपळे, व पिंपळे सौदागर औंध,बाणेर हिंजवडी येतून रेल्वे प्रवासा साठी येत असतात दापोडी येते रेल्वे गेट लगत अनेक अपघात होत असतात तसेच शेजारीच भाजी मार्केट असून आपण हलक्यागती दुचाकी ,तीनचाकी व चारचाकी साठी वाहनांचा उड्डाणपूल करण्यात यावा व गरजे नुसार खडकी ते मळवली असणारे रेल्वे गेट ठिकाणी भुयारी मार्ग किंवा रेल्वे उड्डाणपूल करण्या यावे विशाल वाळुंजकर यांनी अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली.
तर याबाबत….पुणे डिव्हिजन रेल्वे मॅनेजर रेणू शर्मा हे रेल्वे हद्दी लगत बांधकाम असणारे सर्व सामान्य नागरिकांचा विचारकरता अचानकपणे अतिक्रमण कारवाई करण्यात येणार नाही याबाबत आम्ही सकात्मक असून रेल्वे प्रशासनाने स्थानिक मनपा व राज्य सरकार ला नोटीस सुद्दा देण्यात आले आहे व प्राथमिक चर्चा केली असून तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे स्वतः पुढाकार घेऊन राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहे….पण राज्य सरकार किंवा स्थानिक प्रशासना कडून अजून कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही तरी सर्व सामान्य नागरिकांचा विचार करता आम्ही याबत पुन्हा नोटीस देणार असून ….!
यानंतरच आम्ही मिळालेल्या कोर्टच्या निर्णयानुसार कारवाई करू असे रेणू शर्मा बोलताना व्यक्त केल

Previous articleआमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रकृती स्वास्थासाठी कार्यकर्त्याची विविध ठिकाणी प्रार्थना
Next articleगावाकडच्या (लखमापूर) पोराची गरुडझेप
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here