Home मुंबई धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे सिनेमाचा सोहळा उत्साहात पार पडला

धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे सिनेमाचा सोहळा उत्साहात पार पडला

44
0

राजेंद्र पाटील राऊत

धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे सिनेमाचा सोहळा उत्साहात पार पडला
✍️ मुंबई: विजय पवार कार्यकारी संपादक मुंबई युवा मराठा न्यूज.

मुंबई :- यांची जीवनगाथा मांडणाऱ्या ” धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे ” या सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या सिनेमाच्या माध्यमातून गुरुवर्य आनंद दिघे नक्की कोण होते, सर्वसामान्य माणसाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी कसं संघर्षमय आयुष्य जगलं त्याची गाथा पहिल्यांदाच मोठया पडद्यावर येणार आहे. त्यांचा आदेश आम्हा सगळ्यासाठी शिरसावंद्य होताच, पण त्यांचं सोबत असणं देखील प्रत्येक शिवसैनिकाला भक्कम आधार देणारं होतं, ते होते म्हणून मी आज इथे आहे असे भावोद्गार यासमयी बोलताना व्यक्त केले.
यावेळी गुरुवर्य आनंद दिघे यांची भूमिका पडद्यावर साकारणारे अभिनेते प्रसाद ओक, माझी भूमिका पडद्यावर साकारणारे अभिनेते क्षितिज दाते या सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे तसेच सिनेमाचा निर्माता मंगेश देसाई यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केले.
यासमयी आनंद दिघे साहेबांच्या भगिनी अरुणाताई गडकरी, भवानी पतपेढीचे अध्यक्ष अशोक पुराणिक, राबोडी येथील सरस्वती हायस्कूलच्या प्राचार्या मीरा कोरडे, ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ. सोमण, ज्येष्ठ शिवसैनिक उद्धवराव जगताप, ज्येष्ठ पोलीस अधिकारी संजय मोहिते यांनी दिघे साहेबासोबतच्या आपल्या आठवणींचा पट यावेळी उलगडला.
याच ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते तसेच जुन्या शिवसैनिकांच्या साथीने आणि सिनेमातील सर्व कलाकारांच्या सोबत या सिनेमाच्या ध्वनिफितीचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी खासदार राजन विचारे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेता क्षितिज दाते, झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी, अश्विन पाटील, शशिकांत जाधव, हेमंत पवार, सर्व जुने जाणते शिवसैनिक, धर्मवीर सिनेमातील सर्व कलावंत तंत्रज्ञ उपस्थित होते.

Previous articleचि. पार्थ लवकुश भोजने २रा वाढदिवस साजरा करण्यात आला भोजने परिवाराकडून
Next articleशिवणे , कोंढवे , कोपरे व उत्तमनगर या चार गावांचा पाणी प्रश्न सुटला
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here