राजेंद्र पाटील राऊत
रत्नागिरी ब्लड स्टोरेज सेंटर चा लोकार्पन सोहळा डॉ. संघमित्रा फुले यांच्या हस्ते पार पडला.
रत्नागिरी (सुनील धवडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-दिनांक १७ एप्रिल २०२२ रोजी रत्नागिरी शहरात परकार हॉस्पिटल मध्ये आरोग्याच्या दृष्टीने व तातडिने सेवा देणारी कोल्हापूरच्या वैभवीलक्ष्मी ब्लड बँक द्वारे रत्नागिरी ब्लड स्टोरेज सेंटर या नावाने एक सुसज्ज व अत्याधुनिक रक्तपेढी सुरु केलेली आहे. तसेच रत्नागिरी तथा मुंबई, कोल्हापूर, सांगली,मिरज अशा नामांकित जिल्हामध्ये रक्तपेढ्या असून आपल्याला रक्ताची बँग अतिशय माफक दरात उपलब्ध होणार आहे.
या सोहळ्याला आलेल्या मान्यवरांचे स्वागत रोहिणी जोशी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. त्यानंतर रत्नागिरी ब्लड स्टोरेज सेंटर विषयी सर्व माहिती मान्यवरांना देणयात आली. या उद्धाटन सोहळ्याला डॉ.ए.डि.परकार, डॉ.मतीन परकार, डॉ. संतोष बेडेकर, डॉ. संदिप करे, वैभवीलक्ष्मी ब्लड बँकेचे सर्वेसर्वा अनमोल कामत सर, छावा प्रतिष्ठान रत्नागिरी चे अध्यक्ष सुनिल धावडे, नगरसेवक सुहेल मुकादम, दिपक जाधव, रोहिणी जोशी, वैभवीलक्ष्मी ब्लड बँक व रत्नागिरी ब्लड स्टोरेज सेंटरची सर्व टिम उपस्थित होती.