Home गडचिरोली लोलक सुधारणेचे विद्यालय म्हणजेच राष्ट्रसंतांची सामुदायिक प्रार्थना – डॉ. संदीप लांजेवार

लोलक सुधारणेचे विद्यालय म्हणजेच राष्ट्रसंतांची सामुदायिक प्रार्थना – डॉ. संदीप लांजेवार

163
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220406-WA0036.jpg

लोलक सुधारणेचे विद्यालय म्हणजेच राष्ट्रसंतांची सामुदायिक प्रार्थना – डॉ. संदीप लांजेवार                                                   गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

श्री गुरुदेव योग शिक्षण व सेवा समिती गडचिरोली व संत नगाजी महाराज देवस्थान कमिटी,शाहूनगर गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “चैत्र नवरात्र” च्या चवथ्या दिवशी नगाजी महाराज मंदिर येथे आज “सामुदायिक प्रार्थना” आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. संदीप लांजेवार उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात संदीप लांजेवार यांनी उपस्थित सर्व उपसकाना सांगितले की,
है प्रार्थना गुरूदेवसे, यह स्वर्गमय संसार हो ! अतीउच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो !
सामुदायिक प्रार्थना म्हणजे सर्वानी एक येवुन आपले आदर्शानुसार भाव सर्वशक्तिमान अशा प्रभूजवळ मांडण्याची एक पद्धत. मानसिक शक्ती व शांति मिळविण्याची एकमेव उत्कृष्ट कवायत. सामुदायिक प्राथनेची कवायत अंतरंग व बहिरंग अत्यंत स्वच्छ व सरळ ठेवून करावयाची असते.सामुदायिक प्रार्थनेत सामुदायिक तत्वाला प्राधाण्य दिले आहे. आकुंचित जीवभावाचा प्रवास त्या विशाल गुरूदेवाच्या मार्गी लागावा आणि गाव समाज स्वर्गासमान व्हावे. या महान दृष्टीने महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेचे प्रयोजन केले आहे.
सर्व धर्माचा समन्वय, विश्व शांतीचा उपाय !
लोक सुधारणेचे विद्यालय, सामुदायिक प्रार्थना!!
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी स्वातंत्र्याच्या काळात जसे लोकांना धार्मिकतेच्या नावाने एकत्र आणून त्यांच्या कडून क्रांती करण्यासाठी सामुदायिक गणेशोत्सवा ची निर्मिती केली त्याच प्रमाणे सर्वजाती, पंथ, संप्रदाय व धर्माचे लोक एकत्र आणून त्यांच्याकरवी गावाचे पुनरुत्थान साधण्यासाठी वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेची प्रणाली निर्माण केली आहे. लोकांनी सामुदायिक प्रार्थनेत यावे आणि समाजाला सहायक व्हावे म्हणजे पूर्ण गावात परस्पर प्रेमभाव बंधु भाव निर्माण व्हावा हा फार मोठा उद्देश या प्रार्थनेमध्ये आहे.
कोणतीही मुर्ती नाही असे समोरील अधिष्ठान, अविचल चित्ताचे प्रतिक निळ्या पायलीतील दिपक, वातावरण निर्मितीसाठी धूपबत्ती, प्रकाशमान उगवता सुर्य, प्राणीमाञाचे कल्याण होवो ही भावना निर्माण करणारे बोधवाक्य, निळा सागराच्या रूपात शांती, शुद्धतेचे प्रतिक कमळाचे चिन्ह, एकमेकात गुंफलेले विषारी नाग एकञ आलेले आहेत. शांत सौम्य अशा निळसर प्रकाशात आपण स्थीर होऊन प्रार्थना करतो. हे वातावरणच मनाला शांत करणारे, मनाचा ताप हरणारे, सुख शांती देणारे आहे.
सामुदायिक प्रार्थनेचा परिणाम ईतका व्यापक, गंभीर आणि उत्कृष्ट होतो, की लोकांना सामाजिक शांती कशी असते याचे ज्ञान होऊ लागते. चार लोकात बसताना व उपासना करताना किती गंभीरतेची नि शिस्तीची आवश्यकता आहे याचा सक्रिय पाठ मिळतो आणि जीवनाच्या विकासाच्या दृष्टीने प्रत्येक मनुष्याचा प्रार्थनेचा काय संबंध आहे हे अनुभवास येते. सामुदायिक वृत्ती, शिस्त, परस्पर प्रेम, शांतता, एकांतता, उत्साह आणि ज्ञानविकास या दृष्टीने सामुदायिक प्रार्थना हे सक्रिय शिक्षणाचे केंद्र म्हणणे अधिक समर्पक होईल ! असे प्रतिपादन डॉ. संदीप लांजेवार यांनी केले आहे.
कार्यक्रमास खुशरंग शेंडे, रामा नराते, महागु तुराटे, रामकृष्ण ताजने सर,विजय गिरसावळे, अनंता पंदिलवार, सुनील चडगुलवार, ज्ञानेश्वर बांबल, दिगंबर रामटेके, मनोज सिंह पवार, बाबा नक्षिने, प्रणय मेडपल्लिवार, कुशल काळबांधे, हर्ष भांडेकर, रेखा ताई वाटेकर, शालु शेंडे, कल्पना ईझनकर, प्रेमिला लांजेवार, ताराबाई ठाकरे, सिमा बर्वे, अर्चना नक्षिने प्रिति मुक्तावरम, यामिनि मेडपल्लिवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आयोजन प्रविण मुक्तावरम यांनी केले व आभार प्रदर्शन नामदेवराव ईझनकर यांनी केले.

Previous articleआमदार डॉ देवरावजी होळी यांनी साजरा केला भाजपा दिवस। स्थापना दिनानिमित्य आपल्या घरावर फडकविला भाजपाचा झेंडा।
Next articleमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संग्रामपूर तालुक्यात कामगार संचाचे वाटप   
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here