राजेंद्र पाटील राऊत
स्वानंद सेवा सदन चे भूमिपूजन अर्नाळा येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते संपन्न.
दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे प्रतिपादन
बांबू संवर्धनाचे काम करणाऱ्या बांबू सेवकांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
पालघर (वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क) : दिव्यांग बालकांच्या शैक्षणिक गरजा भागविण्यासाठी राज्यामध्ये विविध संस्था कार्य करत आहेत. या संस्थांना पाठबळ देण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे असल्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सांगितले
नूतन गुलगुले फाऊंडेशन संचलित दिव्यांगासाठी उभारण्यात येणाऱ्या स्वानंद सेवा सदन या इमारतीचे भूमिपूजन अर्नाळा येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते.
ज्या दिव्यांग बालकांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी पालक उचलू शकत नाहीत अशा बालकांसाठी स्वयंसेवी संस्था या कार्य करत असतात या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांचे पालन पोषण तर होतेच तसेच त्यांच्या शिक्षणाची जबाबदारीही स्वयंसेवी संस्था उचलत असते. आशा स्वयंसेवी संस्थांना समाजातील दानवीरांनी तसेच समाजातील प्रत्येक घटकाने आर्थिक मदत करून सामाजिक जबाबदारी पार पाडावी असे आवाहनही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले
नूतन गुळगुळे फाउंडेशन गेल्या पंचवीस वर्षापासून दिव्यांग व्यक्तींचा विकासासाठी कार्य करत आहे आता ही संस्था स्वानंद सेवा सदन या इमारतीच्या रूपाने दिव्यांगाच्या पाठीशी भक्कमपणे उभा टाकेल असा विश्वासही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केला
भालीवली गावातील सेवा विवेक या संस्थेने गावांमधील आदिवासी बांधवांना बांबूपासून विविध दैनंदिन उपयोगातील वस्तू बनविण्यासाठी प्रेरित केले आहे. संस्थेने या उद्योगाकडे स्थानिक गावकऱ्यांना आकर्षित करून स्थानिकांना अधिकाधिक रोजगार कशाप्रकारे देता येईल याकडे लक्ष केंद्रित करावे. असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.
बांबू संवर्धनामध्ये तसेच बांबू पासून वस्तू बनविण्यामध्ये योगदान देणाऱ्या बांबू सेवकांना संस्थेमार्फत देण्यात येणारा बांबू सेवक हा पुरस्कार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला
यावेळी खासदार राजेंद्र गावित, सर्वश्री आमदार हितेंद्र ठाकूर, राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालिमठ, आदी उपस्थित होते.