Home विदर्भ अनुप कोहळे आणि राधिका जुवारे यांचा नेहरू युवा केंद्र, गडचिरोली तर्फे सत्कार

अनुप कोहळे आणि राधिका जुवारे यांचा नेहरू युवा केंद्र, गडचिरोली तर्फे सत्कार

147
0

राजेंद्र पाटील राऊत

अनुप कोहळे आणि राधिका जुवारे यांचा नेहरू युवा केंद्र, गडचिरोली तर्फे सत्कार

गडचिरोली,सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क:/ युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालय भारत सरकार व नेहरू युवा केंद्र च्या वतीने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सव 2022 करिता गडचिरोली जिल्ह्यातून निवड झाल्याबद्द अनुप कोहळे, राजनगट्टा आणि राधिका जुवारे आमगाव (म.) यांचा नेहरू युवा केंद्र गडचिरोली च्या वतीने मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नेहरू युवा केंद्र गडचिरोली चे जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे, अध्यक्ष म्हणून हरडे महाविद्यालयाचे प्राचार्य बनपूरकर, मुख्य अतिथी म्हणून चामोर्शी च्या नगराध्यक्ष जयश्री वायलालवर, सिनेट सदस्य डॉ.संदीप लांजेवार, डॉ.विठ्ठल चौथाले, हरडे महाविद्यालय रासेयो प्रमुख डॉ.पवन नाईक सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. अनुप कोहळे नेहरू युवा केंद्र चा सदस्य आहे.त्याला महाराष्ट्र शासनाचा 2021 चा जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त झाला असून जिल्ह्यातील युवकांचे संघटन करून त्यांना पुढे येण्या करिता नेहमीच विविध समजपयोगी उपक्रम व विविध स्पर्धांचे आयोजन करत असतो तर राधिका जुवारे ही देवतळे महाविद्यालयात शिक्षण घेत असून रासेयो ची सक्रिय विद्यार्थीनी आहे. दोघांनाही उपस्थित मान्यवरांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here