Home नांदेड जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे सरकार जबाबदार राहील-कलंबरकर

जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे सरकार जबाबदार राहील-कलंबरकर

53
0

राजेंद्र पाटील राऊत

जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे सरकार जबाबदार राहील-कलंबरकर

संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका प्रतिनिधी

रात्रीला पाणी देतांना हिवाळ्यात कडाक्याची थंडी आणि प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या जीवाला धोका आहे.म्हणून,शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री ऐवजी दिवसा 10 तास लाईट मिळाली पाहिजे.या मागणीसाठी शेतकरी नेते राजू शेट्टी गेल्या 9 दिवसापासून कायदेशीर मार्गाने आंदोलन करत असतांना सरकार या गंभीर प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.यामुळे भविष्यात आंदोलनाला तीव्र स्वरूप प्राप्त होऊ शकते.आणि याला केवळ सरकार जबाबदार असेल.बाऱ्हाळी विभागाला कायस्वरूपी उपअभियंता देऊन या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत असा निवेदनातून इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी कार्यकारी अभियंता चटलावार यांना दि.2 मार्च रोजी दिला.
शेतीला रात्री पाणी देणे म्हणजे जीव धोक्यात टाकणे आहे.रात्री शेतीला पाणी देतांना वन्य प्राण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांचा जीव गेला आहे.तरी सरकार या प्रश्नाकडे गंभीरतेणे पाहात नाही.हे संतापजनक आहे.रब्बी हंगामात येणं कड्याक्याच्या थंडीत रात्री शेतकऱ्यांला शेतीला पाणी द्यावं लागतं,हे दुर्दैवी आहे.म्हणून,शेतीला पाणी देण्यासाठी रात्री ऐवजी दिवसाची लाईट द्यावी.सरकारने आंदोलनाची दखल घेऊन,तात्काळ हा प्रश्न सोडवावा अन्यथा भविष्यात आंदोलन अधिक तीव्र होईल आणि यासाठी केवळ सरकार जबाबदार राहील,असा इशारा निवेदनात दिला आहे.या निवेदनावर शिवशंकर पाटील कलंबरकर,स्वा.शेतकरी संघटनेचे जिल्हा सचिव बालाजी माळेगावे,देगलूर ता.अध्यक्ष विष्णू पाटील,ता.उपाध्यक्ष हरिदास पाटील,सो.मी.ता.अध्यक्ष शंकर आतनुरे,श्रीकांत बनबरे,प्रथमेश जाधव,बळीराम बाबरे,ज्ञानेश्वर जाधव,लखन जोशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here