राजेंद्र पाटील राऊत
देवळा,(भिला आहेर तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) : येथील आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या निर्देशानुसार तालुक्यातील कृषी वीज धोरण व वीज प्रश्नांबाबत तालुक्यातील लोकप्रतिनिधी, वीजग्राहक शेतकरी व अधिकारी यांची आज बुधवार (ता.२३) रोजी बैठक संपन्न झाली. यावेळी देवळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर, माजी सरपंच भाऊसाहेब पगार, पंचायत समितीचे माजी सभापती केदा शिरसाठ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ, सामाजिक कार्यकर्ते भिला आहेर, उपसरपंच भिका शिरसाठ आदि पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
याप्रसंगी शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्याबाबतच्या समस्या मांडण्यात आल्या. पूर्ण दाबाने दिवसा वीजपुरवठा न होणे, जळालेले रोहित्र भरून देखील न मिळणे या मागण्या भाऊसाहेब पगार यांनी केल्या. याबाबत तातडीने अमलबजावणी करण्याचे तसेच असे रोहित्र त्वरित बदलून देण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीस महावितरण मालेगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता रमेश सानप, कार्यकारी अभियंता रामसिंग राठोड, उपकार्यकारी अभियंता बंकट सुरवसे, कक्ष अभियंता रवींद्र खाडे, जितेंद्र देवरे व इतर अधिकारी उपस्थित होते. कृषीवीज धोरण २०२०, दहीवड सौरऊर्जा उपकेंद्रचा लेखाजोखा बंकट सुरवसे यांनी मांडला.
दि.२३/२/२०२२
भिला आहेर
देवळा:- येथील आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या निर्देशानुसार तालुक्यातील कृषी वीज धोरण व वीज प्रश्नांबाबत तालुक्यातील लोकप्रतिनिधी, वीजग्राहक शेतकरी व अधिकारी यांची आज बुधवार (ता.२३) रोजी बैठक संपन्न झाली. यावेळी देवळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर, माजी सरपंच भाऊसाहेब पगार, पंचायत समितीचे माजी सभापती केदा शिरसाठ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ, सामाजिक कार्यकर्ते भिला आहेर, उपसरपंच भिका शिरसाठ आदि पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
याप्रसंगी शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्याबाबतच्या समस्या मांडण्यात आल्या. पूर्ण दाबाने दिवसा वीजपुरवठा न होणे, जळालेले रोहित्र भरून देखील न मिळणे या मागण्या भाऊसाहेब पगार यांनी केल्या. याबाबत तातडीने अमलबजावणी करण्याचे तसेच असे रोहित्र त्वरित बदलून देण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीस महावितरण मालेगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता रमेश सानप, कार्यकारी अभियंता रामसिंग राठोड, उपकार्यकारी अभियंता बंकट सुरवसे, कक्ष अभियंता रवींद्र खाडे, जितेंद्र देवरे व इतर अधिकारी उपस्थित होते. कृषीवीज धोरण २०२०, दहीवड सौरऊर्जा उपकेंद्रचा लेखाजोखा बंकट सुरवसे यांनी मांडला. यावेळी त्यांनी सांगितले कि, देवळा उपविभागात १४ हजार ४५७ कृषीग्राहक असून त्यांची थकबाकी ९८ कोटी ४३ लाख रु. इतकी आहे. त्यापैकी ९ हजार १९० ग्राहकांनी योजनेंतर्गत १७ कोटी रु.भरले तर २ हजार ७९३ कृषीग्राहकांनी या योजनेचा पूर्ण फायदा घेत थकबाकी शून्य केली. ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत योजनेत सहभाग घेतला नाही अशा ५ हजार २६७ ग्राहकांचा नियमानुसार वैयक्तिक विद्युतपुरवठा खंडित करण्यात येत आहे.
अधीक्षक अभियंता रमेश सानप म्हणाले कि, दहीवडच्या सोलर उपकेंद्रावरील थकबाकी एक कोटी ३५ लाख रु.आहे. महावितरण परिपत्रकानुसार सप्टेंबर २०२० पासूनची चालू बिलाची ८० टक्के रक्कम भरल्यास त्यांना दिवसा विद्युतपुरवठा दिला जाईल. ठेंगोडा उपकेंद्रात रोहित्र क्षमता वाढ करून वीजपुरवठा सुरळीत केला आहे. याशिवाय देवळा उपविभागात पिंपळगाव, खालप व देवळा शिवार येथे नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे.




