राजेंद्र पाटील राऊत
ग्रुप ग्रामपंचायत बोंडये नारशिंगे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी. रत्नागिरी/सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज
रत्नागिरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोंडये नारशिंगे मध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रारंभीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार ग्रामपंचायत च्या विद्यमान सरपंच सुहानी कुळ्ये यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.
या प्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत बोंडये नारशिंगे उपसरपंच महेश देसाई, ग्रामसेवक राहुल सोनकांबळे, संगणक परीचालक समीर गोताड, रेश्मा कुळ्ये,ग्रामपंचायत सदस्या विणा पानगले, अर्पिता पानगले यांची उपस्थिती लाभली.
त्याचप्रमाणे सुहानी कुळ्ये,महेश देसाई, राहुल सोनकांबळे, समीर गोताड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग आपल्या मनोगतातून कथन केले. शेवटी महेश देसाई यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.