Home नांदेड तीन दिवसांच्या कार्यक्रमांनी रातोळी नगरी दुमदुमली -लोककला व लावणी महोत्सवात परिसरातील रसिक...

तीन दिवसांच्या कार्यक्रमांनी रातोळी नगरी दुमदुमली -लोककला व लावणी महोत्सवात परिसरातील रसिक – श्रोत्यांची गर्दी-

103
0

राजेंद्र पाटील राऊत

तीन दिवसांच्या कार्यक्रमांनी रातोळी नगरी दुमदुमली

-लोककला व लावणी महोत्सवात परिसरातील रसिक – श्रोत्यांची गर्दी-

नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्युज)

नायगाव – रातोळी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री. रोकडेश्वर यात्रा महोत्सवानिमीत्त सात दिवस सप्ताह , किर्तन , नयनरम्य आतिषबाजी , पशुप्रदर्शन , जंगी कुस्त्यांचा फड , मनोरंजनात्मक कार्यक्रम या कार्यक्रमाबरोबरच रातोळी यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला लोककला व लावणी महोत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

रातोळी येथे श्री. रोकडेश्वर यात्रा महोत्सवानिमीत्त समस्त गावकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विविध समाजोउपयोगी उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केला जातो. यावर्षीही कला संस्कृतीची योग्य शिकवण देणाऱ्या विविध कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी दि. १८ रोजी लोककला व लावणी महोत्सवाचे उद्घाटन कै. गणेश वनसागरे लोककला मंचावर करण्यात आले. या स्पर्धत अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. यात प्रथम , द्वितीय , तृतीय क्रमांक मिळविलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र , बक्षीस , शाल व श्रीफळ देवुन सन्मानित करण्यात आले.

यात नामांकित कलाकार , बालकलाकार , टिकटॉकमधील लावणी सम्राश्री किरण कोरे यासह गिरी संच नायगाव , संतोष चव्हाण , अमोल जावदेकर, स्वरांजली जोंधळे , सोनाली भेदेकर , विद्या नांदेडकर, आरोही डोंगरे , माहेश्वरी स्वामी, दिपाली मेहरकर, सोनाली पुणेकर, गणेश काकडे संच नांदेड यासह आदी कलाकारानी भाग घेवून महाराष्ट्र|तील गोंधळी, लावणी, हिंदी व देशभक्तीपर गीत , जुगलबंदी आदी प्रकार विविध कलावंतानी आपल्यातील कलागुण सादर करून येथील रसिक – श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. नांदेड जिल्हयातील प्रसिद्ध असलेल्या रातोळी येथील अनेक भक्ताचे श्रध्दास्थान व नवसाला पावणाऱ्या श्री. रोकडेश्वर महाराज यात्रेनिमीत्त भरगच्च तिन दिवसीय विविध धार्मीक कार्यक्रमाबरोबरच पारंपारिक लोककला व लावणी महोत्सव पाहण्यासाठी रातोळी नगरी दुमदुमली होती. यावेळी कला महोत्सव पाहण्यासाठी जिल्ह्यातील रसिक – श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटी रातोळी व समस्त रातोळीकरांनी परिश्रम घेतले.

Previous articleनायगाव जनता विकास आघाडीच्या वतीने शहरामध्ये हिंदू मुस्लिम सिख ईसाई यांच्यासह मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली
Next articleजिंतूर तालुक्यातील कावी येथे पारंपारिक पद्धतीने शिवजयंती उत्साहात साजरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here