Home गुन्हेगारी बहिणीला’  भेटायला आलेल्या भावावर कुऱ्हाडीने हल्ला! जखमी भावाची मृत्यूशी झुंज; सुनेची सासऱ्याविरुद्ध...

बहिणीला’  भेटायला आलेल्या भावावर कुऱ्हाडीने हल्ला! जखमी भावाची मृत्यूशी झुंज; सुनेची सासऱ्याविरुद्ध तक्रार; शेगाव तालुक्यातील घटना

433

राजेंद्र पाटील राऊत

बहिणीला’  भेटायला आलेल्या भावावर कुऱ्हाडीने हल्ला! जखमी भावाची मृत्यूशी झुंज; सुनेची सासऱ्याविरुद्ध तक्रार; शेगाव तालुक्यातील घटना
(ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज बूलडाणा ) ः बहिणीला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणावर बहिणीच्या सासऱ्याने कुऱ्हाडीने हल्ला चढवला. हल्ल्यात गंभीर जखमी भाऊ सध्या नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्‍यूशी झुंज देत आहे. १४ फेब्रुवारीला सायंकाळी शेगाव तालुक्यातील जानोरी येथे ही घटना घडली. याप्रकरणी आज, १६ फेब्रुवारी रोजी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. विवाहितेच्या तक्रारीवरून तिच्या सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनराज महादेव हातेकर (३०, रा. वानखेड, ता. संग्रामपूर) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, धनराज त्याच्या मित्रासोबत बहिणीला भेटण्यासाठी जानोरी येथे गेला होता. त्याच्या बहिणीचे सासरे अशोक इदोकर (६१) यांनी तू आमच्या घरी कशाला आला, असा प्रश्न केला. त्यानंतर अशोक इदोकार याने घरातून कुऱ्हाड आणली.

Previous articleसंत सेवालाल महाराज यांची 283 वी जयंती उंद्री प.दे. (सोसायटी तांडा )येथे उत्साहात साजरी.
Next articleअवैध रित्या रेतीची वाहतूक करतांना अधिकाऱ्यांनी रेती माफियांच्या मुसक्या आवरीत केला ट्रॅक्टर जप्त.               
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.