Home नांदेड अंबुलगा सोसायटीच्या चेअरमन पदी बालाजीराव पाटील अंबुलगेकर यांची बिनविरोध निवड…

अंबुलगा सोसायटीच्या चेअरमन पदी बालाजीराव पाटील अंबुलगेकर यांची बिनविरोध निवड…

218
0

राजेंद्र पाटील राऊत

अंबुलगा सोसायटीच्या चेअरमन पदी बालाजीराव पाटील अंबुलगेकर यांची बिनविरोध निवड…

नांदेड,(मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातील मौजे अंबुलगा (बु. खु.) येथे दि.४ रोजी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक पार पडली.मुखेड पंचायत समितीचे माजी उपसभापती बालाजीराव पाटील अंबुलगेकर यांची चेअरमन पदी तर व्हॉईस चेअरमन पदी डॉ. मष्णाजीराव चल्लावाड यांची बिनोविरोध निवड करण्यात आली.यावेळी सर्वप्रथम माजी उपसरपंच कै. लक्ष्मणराव देशमुख यांचे दि.१ रोजी दुःखद निधन झाले असल्यामुळे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहण्यात आली , यावेळी गावातील जेष्ठ नागरिक व्यंकटराव कलेटवाड सर यांची प्रमुख उपस्थिती होती ,चेअरमन निवडीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधाकरराव मामीलवाड हे होते. शिवाजी बळवंतराव पा.अंबुलगेकर,व बालाजीराव पा.यांनी मनोगत व्यक्त केले.अंबुलगा नगरीचे सरपंच हुल्लाजी मामा रॅपनवाड, उपसरपंच शरद पाटील यांनी नूतन चेअरमन व व्हॉइस चेअरमन समवेत सोसायटीचे सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या, दि.१८ जानेवारी रोजी झालेल्या सेवा सहकार सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत मुखेड पंचायत समितीचे माजी उपसभापती बालाजीराव पाटील अंबुलगेकर व शिवाजी पाटील अंबुलगेकर यांच्या भक्कम नेतृत्वाखाली शेतकरी ग्रामविकास पॅनलने १३ पैकी १३ जागा जिकुंन लालबावटा प्रणित लोकपर्याय पॅनलचा पराभव केला होता. शेतकरी ग्रामविकास पॅनल मधून अंबुलगा सेवा सहकार सोसायटीतून बालाजीराव पाटील अंबुलगेकर, पाटील पार्वतीबाई बळवंतराव, सौ. विठाबाई नागमवाड, उल्लीगडे मारोतीराव, कदम बालाजी, कल्याणपाड गोपाळ, चल्लावाड मष्णाजी, देशटवाड रमेश, झाडे गुणवंत, झाडे माधवराव ,रामदिनेवार विश्वनाथ , मंत्रे हाणमंत , सोनकांबळे निवृती , यांचा प्रचंड मतांनी विजय झाला होता शेतकरी ग्रामविकास पॅनल च्या विजयानंतर चेअरमन निवडीची प्रक्रिया उत्साहात पार पडली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सिध्दोधन पिराजी सोनकांबळे यांनी केले तर आभार सुरेश सोनकांबळे यांनी केले.यावेळी दिगंबर झाडे साहेब,सुरेश पोगुलवाड,शंकर पाटील,बाळू डगरे, सलीम कुरेशी,प्रसाद कल्याणपाड,पपू पाटील, विठलराव नागमवाड,देविदास झाडे,बाबूसावकार उलीगडे, विठ्ठलराव कौरवाड, सतीश पाटील ,गंगाधर रायफळे, मचिंद्र सोनकांबळे ,श्रावण कांबळे,रावण कांबळे, किशन पांढरे,मारोती मंत्रे, राजीव पांढरे ,बालाजी धोंडीबा झाडे, उमाकांत मोतेवार
अंबुलगा ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ,सहायक निबंधक कार्यालयाचे कर्मचारी ,अंबुलगा येथील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती ..

Previous articleसिंचन प्रकल्पांची कामे प्राधान्याने पूर्ण करा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Next articleमौजे केरूर येथे श्री संत तुकाराम महाराज मंदिर बांधकाम भूमिपूजनाचा सोहळा संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here