Home नांदेड किडनी ग्रस्त रुग्णांना मोफत डायलिसिस सेवा वाढीव मशिन्स तसेच नवीन बिल्डींग उद्घाटन...

किडनी ग्रस्त रुग्णांना मोफत डायलिसिस सेवा वाढीव मशिन्स तसेच नवीन बिल्डींग उद्घाटन लोकार्पण सोहळा

65
0

आशाताई बच्छाव

IMG-20220926-WA0044.jpg

किडनी ग्रस्त रुग्णांना मोफत डायलिसिस सेवा वाढीव मशिन्स तसेच नवीन बिल्डींग उद्घाटन लोकार्पण सोहळा
स्वप्निल देशमुख जिल्हा प्रतिनिधि बुलढाणा
जळगाव जामोद मतदारसंघांमधील जळगाव जामोद तसेच वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात
जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार संजय भाऊ कुटे, यांच्या हस्ते नुकतेच नवीन डायलेसिस, सेंटरचे उद्घाटन करण्यात आले त्यामध्ये प्रत्येकी ६/६ नवीन मशीन बसविण्यात आलेल्या असून ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल येथे दोन वर्षांपूर्वी १०० लक्ष्य रु. किमतीचे लक्ष्य ठेवून आज त्या नवीन वातानुकूलित सुंदर अश्या इमारतीचे फित कापुन उद्घाटन केले यापूर्वी या दोन्ही तालुक्यातील बऱ्याच रुग्णांना अपुऱ्या मशीन अभावी शेगाव, अकोला, किंवा अमरावती, येथे महिन्यातून सहा वेळा डायलिसिस साठी जावे लागले परंतु आता या तालुक्यातील रुग्णांना कोठेच जायचे काम पडणार नाही हा हे उद्दीष्ट समोर ठेऊन गेल्या २ वर्षांपासून काम चालू केले होते आणि आज ही उत्तम सेवा या तालुक्यात उपलब्ध करून दिली.
त्यांनी संगितले की गेल्या मागील काही वर्षात आपल्या भागात भरपूर किडनीचे रुग्ण आढळून आले कित्येक लोकांचे मृत्यू सुद्धा झाले किडनी आजार हा दूषित पाण्यामुळे होतो त्याकरिता पाण्याचे नमुने केरळच्या लॅब ला पाठवुन त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी दुषित पाणी परिक्षण सिध्द झाल्यामुळे १४० गाव पाणी योजना प्रकल्प राबिण्यात आल्याचे सांगितले. आणि या योजनेमुळे आजरोजी पर्यंत किडनीचे बरेच रुग्ण कमी झाले मृत्यू दर कमी झाला याचे खूप मोठे समाधान व्यक्त केले

ग्रामीण रुग्णालय हे आपल्या भागातील असून येथे असणाऱ्या अपुऱ्या स्टाफ मुळे सेवाभावी पालकांनी आपल्या डॉक्टर्स पाल्यांना सेवा देण्याचे आवाहन केले तसेच जळगाव जामोद आणि वरवट बकाल या दोन्ही ग्रामीण रुग्णालयांमध्ये ८ते १५ दिवसात प्रत्येकी १/१कार्डिक ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध होईल असे सांगितले, जळगाव जामोद येथील रुग्णालयात लवकरच 100 बेडेट हॉस्पिटल ची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले, सध्या संग्रामपूर येथे चालू असलेली PHC चे तालुक्यातील पळशी येथे स्थलांतर करून संग्रामपूर येथे नवीन ग्रामीण रुग्णालय तयार होऊन अख्या महाराष्ट्रामध्ये एकाच तालुक्यात दोन ठिकाणी ग्रामीण रुग्णालय असणे ठरेल,

जळगाव जामोद येथे स्थापित श्रीराम कुटे ट्रस्टच्या वतीने आपल्या भागातील कुपोषित बालकांचे संगोपन करून सेवाभावी लोकांना पालकत्वाची जबाबदारी तसेच क्षयरोग रुग्णांना पोषक आहार सह घरपोच औषध वितरण होईल नुकत्याच झालेल्या आय कॅम्प मध्ये एकाच दिवशी 41000 मुलांची स्क्रीनिंग करणे हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम ठरला आहे असे सांगितले

यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर तरंग वारे, उपसंचालक आरोग्य सेवा,
जिल्हा शल्यचिकित्सक,वैद्यकीय अधीक्षक, इतर अनेक डाक्टर्स,भाजप तालुका अद्यक्ष, इतर अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते व असंख्य नागरिक उपस्थित होते

Previous articleकोविडसह इतर संकटे कायमचे दूर होऊ दे – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची प्रार्थना
Next articleपिंपळे गुरव मघ्ये शामभाऊ जगताप परिवाराच्या वतीने बैलपोळा उत्साहात साजरा, करण्यात आला
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here