Home विदर्भ टिव्ही रिअ‍ॅलिटी शोच्या विजेत्यांचा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह...

टिव्ही रिअ‍ॅलिटी शोच्या विजेत्यांचा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार

123
0

राजेंद्र पाटील राऊत

टिव्ही रिअ‍ॅलिटी शोच्या विजेत्यांचा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार

भावी आयुष्यासाठी दिल्या शुभेच्छा

जिल्ह्याच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

गडचिरोली–(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
शहरातील मनीषा जगदीश मडावी यांनी Runway walk title of india TV Reality show २०२२ हा ‘किताब जिंकून देशपातळीवर गडचिरोली जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एक मानाचा तुरा रोवल्या गेला.
३० जानेवारी रोजी पुणे येथील WE हॉटेल येथे Runway walk title of india TV Reality show२०२२ घेण्यात आला. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातून मनीषा जगदीश मडावी, कृष्णा वासुदेव तळसे, काव्या खुमेंद्र मेश्राम, आर्या नरेश बिडकर, अनुष्का नरेश बिडकर, सिद्धेश खुशाल मुनघाटे, यशश्री विनोद वंजारी, आरुष उत्तमराव मेहेरे यांनी ऑडिशन देऊन थेट ग्रॅण्ड फिनालेमध्ये पोहचत वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये यशस्वीरित्या विजय संपादन करून गडचिरोली जिल्ह्याचे नाव देशपातळीवर रियालिटी नॅशनल टीव्ही शो च्या माध्यमाने पोचविले.आज माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या हस्ते या सर्वांचे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच माजी नगराध्यक्ष यांनी सर्वांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी नगरसेविका वैष्णवीताई नैताम, जगदीश मडावी,खुमेंद्र मेश्राम, अन्नपूर्णा मेश्राम, वासुदेव तळसे,बबिता तळसे उपस्थित होते.

Previous articleआमदार नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी
Next articleराजाराम येथे नागरिकांशी विकास कामांवर चर्चा..!! जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांनी जाणून घेतली समस्या..!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here