Home विदर्भ जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते नागेपल्ली येथे सिमेंट रोड बांधकामाचे...

जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते नागेपल्ली येथे सिमेंट रोड बांधकामाचे भूमिपूजन..!!

100
0

राजेंद्र पाटील राऊत

जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते नागेपल्ली येथे सिमेंट रोड बांधकामाचे भूमिपूजन..!!

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत नागेपल्ली येथे मिलिंद खोंड यांच्या घरापासून ते शाम राऊत यांच्या घरापर्यत सिमेंट कांक्रेट रोडचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.अनेक दिवसांपासून यासाठी जि. प. अध्यक्ष यांच्या कडे या मागण्या रेटून धरला असता जि.प.अध्यक्ष यांनी जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजुरी देऊन सदर कामाचे उद्घाटन केले आहेत. .
या उदघाटन सोहळ्याला अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, उपसभापती सौ.गीताताई चालुरकर, प. स. सदस्या सौ.योगीता मौहूर्ले, नागेपल्लीचे सरपंच लक्ष्मण कोडापे, उपसरपंच रमेश शानगोंडावार, ग्राम प. सदस्य,फिनिक्स गिद्द, ज्योती ठाकरे, गुलाब सोयाम ,अशोक रापेलिवार, विशाल रापेलीवार प्रशांत गोडसेलवार, कार्तिक तोगम प्रकाश दुर्गे, राकेश सड़मेक आदी नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here