Home उतर महाराष्ट्र तामसवाडीचे नाव रोशन आज सुभेदार मेजर प्रल्हाद बाबुलाल वाघ यांना भारतीय सैनिक...

तामसवाडीचे नाव रोशन आज सुभेदार मेजर प्रल्हाद बाबुलाल वाघ यांना भारतीय सैनिक दलात ऑफिसर रँक मध्ये कॅप्टन या पदासाठी नियुक्ती….

159
0

राजेंद्र पाटील राऊत

तामसवाडीचे नाव रोशन आज सुभेदार मेजर प्रल्हाद बाबुलाल वाघ यांना भारतीय सैनिक दलात ऑफिसर रँक मध्ये कॅप्टन या पदासाठी नियुक्ती….

जळगाव ब्युरो टिम:युवा मराठा न्युज नेटवर्क
पुण्यपावन तामसवाडी नगरीसाठी अभिमानाचा दिवस आज जळगाव जिल्ह्यातच नाहीतर पुर्ण महाराष्ट्रात तामसवाडीचे नाव रोशन आज सुभेदार मेजर प्रल्हाद बाबुलाल वाघ यांना भारतीय सैनिक दलात ऑफिसर रँक मध्ये कॅप्टन या पदासाठी नियुक्ती झाली.*

आज आपल्या पुण्यपावन तामसवाडी नगरीतील 1987 दहावीच्या बॅच मधील अभ्यासू व्यक्तिमत्व असणारा विद्यार्थी व मनापासून भारत मातेचे रक्षण करणारा भारतीय सैनिक असलेले सुबेदार मेजर दादासो. प्रल्हाद बाबुलाल वाघ यांना राष्ट्रपती महोदय रामनाथ कोविंद यांच्या परवानगीने भारतीय सैनिक दलाचे पुणे खडकी येथील प्रमुख अधिकारी यांच्या शुभहस्ते आज २६ जानेवारी 2022 रोजी “ऑफिसर रँक कॅप्टन पदी नियुक्ती” झाल्यामुळे फक्त वाघ परिवाराचे नाव उज्वल झाले नसुन आपल्या संपूर्ण तामसवाडी नगरीचे नाव देशाच्या नकाशावर वलयांकित झाले आहे म्हणून, मनापासून भारत मातेचे रक्षण करणाऱे कॅप्टन प्रल्हाद वाघ यांना मानाचा मुजरा व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here