Home नांदेड डोरनाळीत प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मास्क, शैक्षणिक साहित्य वाटप.

डोरनाळीत प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मास्क, शैक्षणिक साहित्य वाटप.

325
0

राजेंद्र पाटील राऊत

डोरनाळीत प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मास्क, शैक्षणिक साहित्य वाटप.

नांदेड  / ब्युरो चीफ मनोज बिरादार युवा मराठा न्युज नेटवर्क
तालुक्यातील मौजे डोरनाळी येथे दि.२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सरपंच तानाजी पाटील शिंदे यांच्या आई वडीलांच्या स्मरणार्थ शिंदे परिवाराच्या वतीने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मुखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी व्यंकटराव माकणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मास्क, वही,पेन, पेन्सिल व उजळणी पुस्तिका देवुन शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेेच नव्याने गठीत करण्यात आलेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलनाने करण्यात आली सदर कार्यक्रमाची प्रस्तावना व सुत्रसंचलन मुख्याध्यापक महेश अंदुरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मुखेड तालुका पत्रकार संघाचे सचिव महेताब शेख यांनी मानले यावेळी गट शिक्षणाधिकारी व्यंकटराव माकणे, सरपंच तानाजी पाटील शिंदे, केंद्र प्रमुख आर.एच. कामन्ना विषयतज्ञ श्रीकांत थगणारे, तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठलराव पा.शिंदे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालाजी शिंदे, पोलिस पाटील मंगलताई शिंदे, रमाकांत पा.शिंदे, अ.भा.छावाचे तालुका सचिव योगेश पा. शिंदे, माजी ग्रामपंचायत सदस्य मालनबी शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी सहशिक्षिका व्ही.व्ही कावर,अंगणवाडी सेविका सिमाताई पांचाळ,आशा वर्कर गोरिबी शेख,बचत गटाच्या अध्यक्षा राधाबाई कोदरे, शेषिकांत पा.शिंदे, माधवराव पा.देवकते, शिवाजी पा. शिंदे, गोविंदराव पा.शिंदे, किरण कोणाळे, विश्वनाथ लालवंडे, रघुनाथ लालवंडे, रोजगार सेवक मस्तान शेख,मुरहारी गायकांबळे, श्रीराम शिंदे, परशुराम शिंदे, इमरान शेख,गणेश शिंदे, विजयानंद गायकांबळे, नारायण देेवकत्ते, जयानंद गायकांबळे, सरफराज शेख यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, विद्यार्थी व गावक-यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here