Home विदर्भ गुटखा माफिया Asp पथकाच्या रडारवर! खामगावच्या निलेश राठी नंतर शेगावात टीबडेवाल बंधूंना...

गुटखा माफिया Asp पथकाच्या रडारवर! खामगावच्या निलेश राठी नंतर शेगावात टीबडेवाल बंधूंना अटक ; लाखोंच्या मुद्देमाल जप्त

147
0

राजेंद्र पाटील राऊत

गुटखा माफिया Asp पथकाच्या रडारवर! खामगावच्या निलेश राठी नंतर शेगावात टीबडेवाल बंधूंना अटक ; लाखोंच्या मुद्देमाल जप्त
ब्युरो चीफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज बुलडाणा

कर्तव्यदक्ष अप्पर पोलीस अधीक्षक श्रवणकुमार दत्त यांनी गुटका माफिया विरोधात धडक मोहीम हाती घेतली असून खामगाव येथील बहुचर्चित निलेश राठी यास बुधवारी अटक झाल्यानंतर शेगांव येथे सुद्धा गुरुवारी कारवाई करत अवैध गुटखा व्यवसाय करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्याकडून गुटखा व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अप्पर पोलीस अधिक्षक श्रवणकुमार दत्त खामगांव यांचे पथक व गुन्हे शोध पथक शेगांव यांनी संयुक्त कारवाई करत शेगाव शहरातील गुटखा विक्री करणारे प्रितम कमलकिशोर टीबडेवाल (वय 36 वर्ष) व सौरभ कमलकिशोर टिबडेवाल (वय 36 वर्ष ) दोन्ही रा. लखपती गल्ली, शेगांव या दोन्ही बंधुवर कार्यवाही केली आहे.
बुधवारी खामगाव गुटका किंग निलेश सुरेश राठी याच्या मुसक्या आवळत जुन्या गुन्हयात निलेश राठी याला अटक केली आहे. डीपी रोड वर अन्न व औषधी विभागाचे अधिकारी यांनी केली होती.काही महिन्यांपूर्वी कारवाई त्यामध्ये 35 लाखाचा गुटखा जप्त केला होता या तपासात आरोपी असलेला अजय खंडारे भीमनगर, शिरसगाव देशमुख याला अटक केली होती. तपासात निलेश सुरेश राठी याचे नाव निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली काल अटकेनंतर कोर्टात हजर केले असता त्याला 14 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास अप्पर पोलीस अधिकारी श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली sdpo अमोल कोळी हे तपास करीत आहेत. दरम्यान गुरुवारी शेगाव येथे टीबडेवाल बंधूना अटक करून अवैध गुटका, मोबाईल असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अग्रसेन चौकातील प्रीतम ट्रेडर्स तसेच लखपती गल्ला गल्लीतील घरातून अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे.

पोउपनि पंकज सपकाळे, व पो.स्टॉप पोहेको अशोक सुर्वे, ना.पो. को रघुनाथ जाधव, गजानन आहेर, नेशसिंग इंगळे पोको राम धामोडे, दिपक राठोड, प्रफुल्लन टेकाळे, मका निगुर्णा सानेटक्के, अनिता गायके असे पोलीस स्टेशन रोगाव शहर येथे पोहचुन पोस्टे शेगाव शहर पंथील गुन्हे शोध पथक प्रमुख पोउपनि नितीन इंगोले, पो.कॉ विजय साळवे, तसेच पो.स्टे. शेगांव ग्रामीण येथील पोउपनि निलेश डावेराव यांनी ही कारवाई केली. सदर गुन्हयाचा पुढील तपास . श्रवणकुमार दत्त (भा.पो.से.) अप्पर पोलीस अधिक्षक सा. खामगांव व शेगांव शहर पो.स्टे. चे टाणेदार श्री. अनिल गोपाळ यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि.नितीन इंगोले पो.स्टे. शेगांव शहर हे करीत आहे.

खरे गुटखाकिंग गजाआड

बुलढाणा जिल्हा गुटखा विक्रीसाठी प्रसिद्ध असून खामगाव चिखली गुटका तस्करीचे केंद्र बनले आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या जिल्ह्यात आतापर्यंत बिनदिक्कत गुटका व्यवसाय सुरू होता मात्र कर्तव्यदक्ष अप्पर पोलीस अधीक्षक श्रवणकुमार दत्त यांनी आता अवैध गुटखा माफियांविरोधात धडक मोहीम हाती घेतली असून खरे आता गुटखाकिंग गजाआड टाकले जात आहेत.

Previous articleदेगलूर तालुक्यातील मौजे वझर येथे जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात साजरा.
Next articleअंबुलगा मंडळात वादळीवारा गारपीटीसह झालेल्या पावसात रब्बी पिकांचे अतोनात नुकसान.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here