जिल्हा काँग्रेस कमिटी व अनुसूचित विभागाच्या वतीने संविधान दिन साजरा
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घरा घरात संविधान पोहचविण्याचा घेतला संकल्प
गडचिरोली:( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- संविधान दिनाचे औचित्य साधून जिल्हा काँग्रेस कमिटी व अनुसूचित विभागाच्या वतीने जिल्हा कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रस्ताविक व बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी संविधानाच्या प्रास्ताविक चे वाचन करून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शपथ दिली यावेळी सर्वांनी घराघरात संविधान पोहचविण्याचा संकल्प घेतला.
घटनाकारांनी सर्वांना समान संधी व न्याय मिळावा व देशात लोकशाही राज्य निर्माण व्हावे म्हणून संविधान तयार केला परंतु सद्या केंद्रातील भाजप सरकार हे हुकूमशाहा बनून संविधान संपविण्याचा प्रयत्न करू पाहत आहे, परंतु काँग्रेसचे कार्यकर्ते असे कदापीही होऊ देणार नाही असे प्रतिपादन महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले. यावेळी शहर काँग्रेस चे अध्यक्ष सतीश विधाते, नगरसेवक रमेश चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, जिल्हा महासचिव समशेरखान पठाण, सोशल मीडिया सेल प्रदेश उपाध्यक्ष नंदुभाऊ वाईलकर, अनुसूचित सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसागडे, शिक्षक सेल अध्यक्ष देवाजी सोनटक्के, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, अनुसूचित जाती सेल महिला अध्यक्ष अर्पणा खेवले, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, राकेश रत्नावार, जितेंद्र मुनघाटे, शहर कार्याध्यक्ष आशिष कामडी, माजी जि. प.अध्यक्ष सोमय्या पशूला, हरबाजी मोरे, सुभास धाईत, वसंत राऊत, दिवाकर मिसार, सुखदेव वासनिक, प्रभाकर कुबडे, संजय चन्ने, दीपक रामने, आय.बी. शेख, बाबूराव गडसुलवार, दीपक रामने, रुपचंद उंदिरवाडे, दीपक मडके, डी.मेश्राम, गिरसावडे, रामदास टीपले, लवकुमार रामटेके, गौरव येणप्रेड्डीवार, विपूल एलट्टीवार, कल्पना नांदेश्वर, सुवर्णाताई उंदिरवाडे, पौर्णिमा भडके, आशा मेश्राम, सुनीता रायपूरकर, नीता वडेट्टीवार, विद्या कांबळे, वर्षा गुलदेवकर आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.