Home Breaking News शिवसेना खासदार भावना गवळीचा निकटवर्तीय सईद खानची मालमत्ता जप्त, इडीची मोठी कार्यवाही!

शिवसेना खासदार भावना गवळीचा निकटवर्तीय सईद खानची मालमत्ता जप्त, इडीची मोठी कार्यवाही!

232
0

देवेंद्र कलकोट – वाशीम तालुका प्रतिनिधी

युवा मराठा न्युज

शिवसेना खासदार भावना गवळीचा निकटवर्तीय सईद खानची मालमत्ता जप्त, इडीची मोठी कार्यवाही!

शिवसेना खासदार भावना गवळी यांची सध्या ईडीकडून बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी चौकशी सुरू आहे. २७ सप्टेंबरला ईडीनं भावना गवळी यांना समन्स बजावलं होतं. त्यांचे निकटवर्तीय सईद खान यांना देखील ईडीकडून अटक करण्यात आली होती.त्यानंतर आता पुन्हा एकदा या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. ईडीने सईद खान यांची मालमत्ता जप्त केली आहे.

३० ऑगस्ट रोजी वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड आणि आसपासच्या ठिकाणी भावना गवळींशी संबंधित संस्थांमध्ये झडती घेण्यात आली होती. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांच्यावर १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. त्यासंदर्भात ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. भावना गवळी वाशिम-यवतमाळच्या शिवसेना खासदार असून त्यांना याआधी २७ सप्टेंबरला समन्स बजावून ४ ऑक्टोबरला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.

महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये झालेल्या कथित घोटाळ्यासंदर्भात ही चौकशी सुरू आहे. दरम्यान, इडीने महिला उत्कर्ष प्रतिष्ठान (सेक्शन ८ कंपनी) कडून बेकायदेशीरपणे निधी पळवून नेल्यासंदर्भात सईद खान यांची ३.७५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे, एनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

काय आहे प्रकरण?

वाशीम जिल्ह्यातील महामार्गाच्या कामांमध्ये शिवसैनिक आडकाठी आणत असल्याची तक्रार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली होती. त्यानंतर गवळी यांनी १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. “भावना गवळींनी ५५ कोटींचा बालाजी पार्टीकल बोर्ड हा कारखाना २५ लाख रुपयात घेतला. सन २०१९ मध्ये रिसोड येथील जनशिक्षण संस्था व महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या कार्यालयातून ७ कोटी रुपये चोरून नेल्याची तक्रार गवळी यांनी केली होती. ७ जुलै २०१९ रोजीच्या चोरीची तक्रार १२ मे २०२० रोजी करण्यात आली. १० महिने उशिरा तक्रार देण्याचे कारण काय? त्या कार्यालयात ७ कोटी कुठून आले?” असे सवाल सोमय्या यांनी केले होते. या संदर्भात केंद्रीय सहकार विभाग, सीबीआय, ईडी, स्टेट बँक, नॅशनल को- ऑप. डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व अन्य ठिकाणी तक्रारी करण्यात आल्या आहेत.

Previous articleधक्कादायक! नाशकात खुन सत्र संपेना; सातपूर भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची निघृण हत्या
Next articleजिल्हा काँग्रेस कमिटी व अनुसूचित विभागाच्या वतीने संविधान दिन साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here