Home Breaking News धक्कादायक! नाशकात खुन सत्र संपेना; सातपूर भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची...

धक्कादायक! नाशकात खुन सत्र संपेना; सातपूर भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची निघृण हत्या

190
0

धक्कादायक! नाशकात खुन सत्र संपेना; सातपूर भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची निघृण हत्या
नाशिक – सागर कटाळे युवा मराठा न्यूज नेटवर्क चॅनेल निफाड तालुका प्रतिनिधी नाशिक शहर परिसरात हत्येचे सत्र सुरू झाले आहे. गेल्या चार दिवसात तब्बल तिसरी हत्या उघड झाली आहे. सातपूर भाजप मंडलाचे अध्यक्ष अमोल इघे यांच्या निघृण खुन करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.सातपूरच्या कार्बन नाका परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. भाजाप पदाधिकाऱ्यांची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राजकीय पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केली जात आहे. या हत्यासत्रामुळे नाशकात भितीचे वातावरण तयार झाले आहे.नाशिककरांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहेत.नाशिक महापालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. याची दखल घेत पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी शहरातील अनेक पोलिस स्टेशनच्या प्रमुखाची कालच तडकाफडकी बदली केली आहे. शहरात हत्या, लूटमार, चेनस्नॅचिंग यासह सर्व प्रकारचे गुन्हे वाढत आहेत. राजकीय स्वार्थासाठी गुन्हेगारांची मदत घेतली जात असल्याचे बोलले जाते. त्यातच गेल्या काही दिवसात शहरामध्ये हत्येच्या घटना समोर येत आहेत. आता सातपूरमध्येही एक हत्या झाली आहे. सातपूर भाजप मंडलाचे अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हे वृत्त समजताच पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांचा मोठा ताफा तैनात झाला आहे. हत्या कुणी, का व कशी केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सातपूर पोलिस याचा तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here