Home Breaking News डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळेच माझ्या निरागस मुलीचा मृत्यु भाग्यश्रीच्या वडीलाचा आरोप : डॉक्टर आणि...

डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळेच माझ्या निरागस मुलीचा मृत्यु भाग्यश्रीच्या वडीलाचा आरोप : डॉक्टर आणि कर्मचार्‍यांवर कारवाईची वडीलाची मागणी

1076
0

डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळेच माझ्या निरागस मुलीचा मृत्यु
भाग्यश्रीच्या वडीलाचा आरोप : डॉक्टर आणि कर्मचार्‍यांवर कारवाईची वडीलाची मागणी
वाशिम -( गोपाल तिवारी ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) तालुक्यातील ग्राम अनसिंगच्या श्रृंगऋषी कॉलनीतील उमेश पडघान यांनी मुलगी कु. भाग्यश्री (वय ५) हिला अंगात ताप असल्याच्या कारणावरुन २७ ऑक्टोंबर रोजी शहरातील बालरोगतज्ञ डॉ. प्रविण वानखडे यांच्या रिसोड नाका येथील हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले होते. परंतु डॉक्टरांच्या गैरहजेरीत कार्यरत महिला कर्मचार्‍याने सलाईन लावल्यानंतर मुलीची तब्येत बिघडली. याबाबत त्वरीत डॉक्टरांना भ्रमणध्वनीवरुन सांगीतल्यानंतरही डॉ. वानखडे आले नाही. त्यामुळे भाग्यश्रीची तब्येत अधिकच बिघडल्यामुळे मुलीला प्रारंभी अकोला व नंतर नागपूर येथे नेण्यात आले. परंतु नागपूर येथे भाग्यश्री वाचू शकली नाही. ७ नोव्हेंबर रोजी तिचा नागपूर येथील कलर्स हॉस्पीटलमध्ये मृत्यु झाला. भाग्यश्रीच्या मृत्युस डॉ. प्रविण वानखडे व हॉस्पीटलचे कर्मचारीच कारणीभूत असल्याचा आरोप त्या दुर्देवी चिमुकलीचे वडील उमेश पडघान यांनी केला आहे. यासंदर्भात पडघान यांनी २२ नोव्हेंबर रोजी पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी व शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.
या निवेदनात नमूद केले आहे की, माझी मुलगी भाग्यश्री हिला २७ ऑक्टोंबर रोजी ताप आल्यामुळे मी व माझी पत्नीने तीला डॉ. प्रविण वानखडे यांच्या वानखडे बाल रुग्णालयात आणल्यानंतर तीला डॉक्टरांनी तपासल्यानंतर एक दोन दिवस भरती ठेवल्यास ठिक होईल असे सांगून औषधी देण्यात आली. त्यावेळी माझी मुलगी चांगली खेळत होती. जेवत होती व बोलत सुध्दा होती. डॉक्टरांनी सांगितलेली औषधी आणल्यानंतर महिला कर्मचार्‍याने माझ्या मुलीला सलाईन लावले. तसेच कोणत्याही प्रकारे डॉक्टरांचा सल्ला न घेता सलाईनमध्ये वेगवेगळी इंजेक्शनने भरली. सलाईनचा वेग नॉमल वेगापेक्षा जास्त केला. त्यानंतर अर्ध्या तासाने सलाईन संपत आले असता माझ्या मुलीला खुप जास्त प्रमाणात थंडी वाजत होती व ती डोळे पांढरे करीत होती व एकदम बेशुध्द झाल्यासारखी झाली व तोंडाला फेस आला. त्यावेळी मी माझी पत्नी, निलेश धुळधुळे, शाम सोमटकर असे सर्व जण आम्ही तेथे हजर असतांना डॉक्टरांना बोलविण्याकरीता गेलो असता डॉक्टर त्यांच्या दवाखाण्यात आढळून आले नाही. तसेच नर्स व कर्मचारी यांनी सुध्दा लवकर येवून माझ्या मुलीला पाहीले नाही. त्यामुळे डॉ. वानखडे यांच्या ७०३८०३३३७७ वर माझ्या मोबाईल क्र. ७३५०८२१३६३ वरून फोन करून संपर्क साधला असता त्यांनी मी सरकारी दवाखान्यात कर्तव्यावर आहे असे सांगीतले. माझ्या मुलींचा उपचाराअभावी मृत्यू होवू शकतो यांची पूर्णपणे जाणीव असतांना सुध्दा माझ्या मुलीवर डॉ. प्रविण वानखडे यांनी योग्य व काळजीपुर्वक स्वतः उपचार न केल्याने तसेच त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसुर केल्यामुळे माझ्या मुलीची तब्येत अत्यंत गंभीर झाली होती. त्यानंतर डॉ. वानखडे ११.३० वाजता दवाखाण्यात आले असता, माझ्या मुलीची तब्येत अत्यंत गंभीर झाल्याने तिला अकोला येथे ऑर्बीट हॉस्पीटल येथे नेले. तेथे तिच्यावर २७ ऑक्टोंबर ते २ नोव्हेंबरपर्यंत उपचार केले. तरी सुद्धा तिची तब्येत न सुधारल्यामुळे तेथून पुन्हा नागपूर येथे कलर्स हॉस्पीटल येथे पुढील उपचाराकरीता हलविले. तेथे उपचार चालू असतांना डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करून सुध्दा तीच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली नाही व शेवटी माझ्या मुलीचा ७ नोव्हेंबर रोजी नागपूर येथेच दुसर्‍या दवाखाण्यात नेतांना मृत्यू झाला. माझ्या मुलीची डॉ.प्रविण वानखडे यांनी योग्यरित्या व काळजीपूर्वक उपचार न केल्यामुळे माझ्या मुलीची तब्येत गंभीर झाली व तिचा मृत्यु झाला. तिच्या मृत्युस डॉ. वानखडे हेच कारणीभूत आहेत. त्यामुळे डॉ. वानखडे व हॉस्पीटलमधील कर्मचार्‍यांवर कारवाई व्हावी. सोबतच सिसिटीव्ही फुुटेजचीही पाहणी करावी व माझ्या मुलीला न्याय द्यावा अशी मागणी उमेश पडघान यांनी केली आहे.

Previous articleपत्रकार राजेंद्र पाटील राऊत लवकरच घेणार निराधार निराश्रीत मुलगी दतक
Next articleधक्कादायक! नाशकात खुन सत्र संपेना; सातपूर भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची निघृण हत्या
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here