Home विदर्भ काँग्रेस पक्षाची विचारधारा गावागावात असल्याने निवडणुकीसाठी जिद्दीने कामाला लागा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष...

काँग्रेस पक्षाची विचारधारा गावागावात असल्याने निवडणुकीसाठी जिद्दीने कामाला लागा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र  ब्राह्मणवाडे यांचे प्रतिपादन  पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीविरोधात वडधा येथे जनजागरण अभियान

79
0

राजेंद्र पाटील राऊत

काँग्रेस पक्षाची विचारधारा गावागावात असल्याने निवडणुकीसाठी जिद्दीने कामाला लागा
काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र  ब्राह्मणवाडे यांचे प्रतिपादन
पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीविरोधात वडधा येथे जनजागरण अभियान
गडचिरोली,( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-
वडधा:- देशामध्ये मोठ्या प्रमाणात महागाईमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे त्यामुळे सात वर्षात मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढ करून सर्वसामान्य जनतेवर भुर्दंड सहन करावा लागत असून काँग्रेसचे कार्यकर्ते गावागावात असल्याने येणाऱ्या निवडूकित   काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिद्दीने कामाला लागावे असे प्रतिपादन काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले.
आज 20 नोव्हेंबर ला आरमोरी तालुक्यातील वडधा येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात जनजागरण अभियान राबवून सभेचे आयोजन करण्यात आले त्यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज वनमाळी , किसान सेलचे अध्यक्ष वामनराव सावसाकडे,   तेजस मडावी,  जी प सदस्य वनिता सहाकाटे, मिलिंद खोब्रागडे , आरमोरी शहर अध्यक्ष शालिक पत्रे, कृष्णा झंझाड , दिलीप घोडाम ,नंदू खान्देशकर ,श्रीकांत काथोडे, रामभाऊ नन्नवरे माजी सरपंच अर्चना कोलते , देलोडा सरपंच डंभाजी हुलके, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ब्राह्मणवाडे म्हणाले भाजपा सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून सर्वसामान्य जनता महागाईमुळे कंटाळली आहे पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीमुळे दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम झाला आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्याने केंद्र शासनाच्या विरोधात सर्वसामान्य जनतेपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचवणे आवश्यक आहे त्यामुळे आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये  काँग्रेसच्य कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागून काँग्रेसची सत्ता येणे काळाची गरज आहे असे आवाहन यावेळी केले.
यावेळी सर्वप्रथम वडधा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांना माल्यार्पण करून वडधा  येथील मुख्य रस्त्याने जनजागृती अभियान रॅली काढण्यात आली त्यानंतर सभेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला जीवन कोलते, अरविंद फटाले  माजी सरपंच अर्चना कोलते, शालू कोलते, प्रतीक खेवले ,केवलराम गेडाम, देवराव कोडाप, ऋषी मानकर शरद कोडाप, दिवाकर भरडकर कानू भोयर, केवलराम नागोसे, प्रभाकर गेडाम, विकास शेडमाके ,देविदास उंदीरवाडे ,राजू कावळे ,पुंडलिक ठाकरे, राजू कोडापे, संतोष लाकडे श्रीकांत भजभुजे, तसेच परिसरातील काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन माजी उपसरपंच विश्वेश्वर दरो, तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन ग्रा पं सदस्य  व तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष भूपेश कोलते यांनी केले.

Previous articleदंगली विरोधात लावलेले भाजपा कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे
Next articleई-श्रम कार्ड च्या माध्यमातून कामगारांनी भारत सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा खा.अशोक जी नेते
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here