Home विदर्भ मनसेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल व डफडे वाजवून निदर्शने आंदोलन एसटी कामगारांच्या आंदोलनाला...

मनसेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल व डफडे वाजवून निदर्शने आंदोलन एसटी कामगारांच्या आंदोलनाला पाठींबा मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

297
0

राजेंद्र पाटील राऊत

देवेंद्र कलकोट – वाशीम तालुका प्रतिनिधी
युवा मराठा न्यूज

मनसेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल व डफडे वाजवून निदर्शने आंदोलन
एसटी कामगारांच्या आंदोलनाला पाठींबा
मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

वाशिम – एस.टी. महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी दिवाळीपासुन पुकारलेल्या एस.टी. कर्मचार्‍यांच्या राज्यव्यापी आंदोलनाला पाठींबा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात सोमवार, १५ नोव्हेंबर रोजी एस.टी. कर्मचार्‍यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डफडे व ढोल वाजवत एकदिवशीय ’निदर्शने’ आंदोलन करण्यात आहे. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.
यावेळी दिलेल्या निवेदनात विविध मागण्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने, एस.टी. कामगारांना न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र एस.टी. महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे, महाराष्ट्र शासनाने सूडबुद्धीने केलेले २१७८ एस.टी. कर्मचार्‍यांचे निलंबन तात्काळ रद्द करण्यात यावे, ३७ एस.टी. कर्मचार्‍यांच्या आत्महत्येस जबाबदार परिवहन मंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व पिडीत कुटुंबांना नुकसान भरपाई देण्यात यावी, लोकशाही मार्गाने आंदोलन करत असतानाही आंदोलकांवर दबाव आणण्यासाठी एस.टी. कर्मचार्‍यांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ रद्द करण्यात यावेत, आत्महत्या केलेल्या एस.टी. कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना भरीव मदत करून कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीवर घेण्यात यावे आदी मागण्या मनसेने निवेदनात नमूद केल्या आहेत.
या आंदोलनात एसटी कर्मचारी व महाराष्ट्र सैनिक जेष्ठ पदाधिकारी रघुनाथ खुपसे, कृष्णा इंगळे, संजय येवले, अमोल तुरेराव, रवि सुरोशे, केशव गलकळ, माधव शिगाड़े, गजानन नाईकवाड़े, मनविसे सर्कल अध्यक्ष दत्ता जावळे, विकी वर्मा, अजय कदम, दीपक ताजने, गजानन बर्डे, मनोज राऊत, राहुल करवते, योगेश भोयर, अक्षय राऊत, नितेश खडसे, देवा खरे, समाधान खरे, राजू शिराळ, सागर खरे, शुभम बांगर, रितिक कांबळे, दिनेश बांगर, सोनू शिंदे, शिवराज बांगर, सौरभ पांडे, गजानन मुखमाले, महंमद चौधरी, युवराज टोलमारे, शिवाजी पवार, कृष्णा बांगर, शुभम सूर्यवंशी, गजु बनसोड, राहुल करवते, सुरेश नेहुल, महादेव तनपुरे, गजानन जेताड़े, संतोष खंडारे, सुनील खडसे, हनुमान जाधव, सुनील अवगण, सतिष महल्ले, गजानन बर्डे, देवा वाघ, संतोष पवार, कुणाल तायड़े, सतिष कड़वे, देवानंद राजगुरु, गोविंद खंडेलवाल, मनीष बतुलवार, ओंकार गंगावने, रवि शिंदे, राजू बेंद्रे, लखन घुगे, एम. वि. लोनसुने, बी. डी. तेलगोटे, संतोष भिसडे, रवि चव्हाण, एस. के. इंगोले, आर. बी. राठोड यांच्यासह एस. टी. कर्मचारी व महाराष्ट्र सैनिक आदी उपस्थित होते. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी मोहन कोल्हे, रितेश देशमुख, प्रतीक कांबळे, श्री देशमुख, आशिष टोलमारे, रितेश देशमुख, विनोद सावके, वेदांत ढवळे, सुहास जाधव, मयूरेश सत्तरके आदींनी परिश्रम घेतले.

Previous articleघेतली तसेच अनेकांनी आर्थिक व वस्तुरुपी देणगी देऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात हातभार लावला.
Next articleआमच्या पोलिसांचा मला अभिमान। ग्रुहमंञ्यानी केले गडचिरोली पोलिस दलाचे कौतुक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here