राजेंद्र पाटील राऊत
जि.प.अध्यक्षांनी अतीदुर्गम कोंदावाही येथील जाणुन घेतल्या समस्या गडचिरोली :(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-एटापल्ली तालुक्यातील अतीदुर्गम कोंदावाही येथे जि.प अध्यक्ष अजय कंकडावार यांनी भेट देवुन समस्या जाणुन घेतल्या.यावेळ नागरिकांशी सवाद साधत विकास कामांवर चचा ही केल्या. या वेळी जि.प.अध्यक्ष अजय कंकडावार यांनी प्रथमच गावाला भेट दिल्याने नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करत शाल श्रीफळ फुष्पगुच्छ देवुन स्वागतही केला। एटापंल्ली तालुक्यातील ग्राम येमली अतंर्गत येणार्या कोंदांवाही गावातील विविध समस्या निर्माण झाले असुन ,गावातील पाण्याची,गली रस्ते,नाली व पुल आधी प्रमुख समस्या असल्याचे नागरिकांनी सांगितले.या वेळी जिल्हा प.अध्यक्षांनी येथिल समस्या सोडवुन देवु असा शब्द दिला.तसेच तेथिल नागरिकांनी मुख्य चौकात बैठक घेवुन चचा केली सदर चचेत विविध समस्या मांडण्यात आले असुन सदर समस्येचे आपण नीवाकरण करु असे सांगीतले. यावेळी आ.वि.स.तालुका अध्यक्ष नंदुभाऊ मठ्ठामी,माझी जिल्हा परिषद सदस्य कारुजी राजपत,प्रज्वल नागुलवार,मंगेश हलामी, महेश बिरमवार,श्रीनिवास बीरमवार ,अजय गावडे,संतोष येरगंटिवार,पाटाळी पल्लो व गावातील नागरीक उपस्थित होते.