Home पुणे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम मंजुरीसाठी नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी चर्चा.. ! 🛑

वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम मंजुरीसाठी नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी चर्चा.. ! 🛑

125
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम मंजुरीसाठी नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी चर्चा.. ! 🛑
✍️ पुणे ( विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम मंजुरीत काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे एनएमसीचे म्हणणे होते. या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय आरोग्य मंत्री मा.श्री. मनसुखजी मांडवीय यांची आज नवी दिल्लीतील आरोग्य मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली. विरोधीपक्ष नेते मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुढाकाराने ही भेट झाली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली असून अंतिम मंजुरीसंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय होणार आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाने आजवर मंजुरीसंदर्भातील सर्व टप्पे पार केले असून आतापर्यंत प्राथमिक मंजुरी देण्यात आली आहे. मात्र अंतिम मंजुरीत काही तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर तातडीने ही भेट घेऊन तांत्रिक अडचण सोडवण्यासंदर्भातील नियोजन केंद्रीय आरोग्य मंत्री मा.श्री. मांडवीय यांच्याकडे दिले. त्यावर मा.श्री. मांडवीय यांनीही सकारात्मकता दाखवली आहे.

अंतिम मंजुरीसाठी आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण केल्या असून सर्व वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठीची सर्व यंत्रणा सज्ज आहे. मात्र अंतिम मंजुरीत काही तांत्रिक मुद्दे उपस्थित झाल्याने त्याबाबत सविस्तर चर्चा केंद्रीय आरोग्य मंत्री मांडवीय यांच्याशी केली आहे.

माझ्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात या संकल्पनेपासून तर अंतिम मंजुरीच्या टप्प्यापर्यंत देवेंद्र फडणवीस यांची मोलाची भूमिका राहिलेली आहे. त्याबद्दल त्यांचे पुणेकरांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. ⭕

Previous articleसार्वजनिक रस्त्यावर फटाके फोडू नयेत : पुणे पोलिस 🛑
Next articleमच्छिमारांची बैठक संपन्न,बारा,गावातील ग्रामपंचायतींचा मच्छिमार बांधवाच्या मागणीला पाठींबा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here