Home माझं गाव माझं गा-हाणं चिमूकल्याची मने जिकली” रोटरी क्लब कडून अनोखी भेट.

चिमूकल्याची मने जिकली” रोटरी क्लब कडून अनोखी भेट.

69
0

राजेंद्र पाटील राऊत

“चिमूकल्याची मने जिकली” रोटरी क्लब कडून अनोखी भेट.     पालघर,(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)

रोटरी क्लब न्यू सिटी ठाणे तसेच रोटरी क्लब चेन्नई याच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील आरोग्य केंद्र मलवाडा येथे छोट्या चिमुकल्याना खेळण्या करिता चिल्डरन पार्क देण्यात आले. रोटरी क्लब तर्फे देण्यात आलेल्या लहान मुलांच्या बागेमध्ये रंगबिरंगी खेळ साहित्य, टेबल,बॅंच,घोडा,घसरगुंडी अनेक प्रकारची आधुनिक व आकर्षक खेळणीचा समावेश आहे.
आदिवासी भागातील या चिमुकल्याचे नेमके मनातले ओळखून या क्लब सभासदांनी अतिशय सुंदर अशी भेट या छोट्या मुलांना दिली आहे. आपली मुलेही या सर्व खेळ साहित्याचा आनंद घेऊ शकतील म्हणून कुतूहलाने बालकाच्या पालकांचे मनही भरून आले.
असा हा आगळा वेगळा व छोट्या पासून मोठ्यांच मन जिंकणार अलौकिक कार्य रोटरी क्लब न्यू सिटी ठाणे व रोटरी क्लब चेन्नई कडून घडले.
या वेळी क्लबचे श्री, सचिन खेडेकर, सौ. सावे मॅडम व इतर सदस्य त्याच बरोबर चेन्नई येथील रोटरी सदस्य उपस्थित होते.
सदर कार्यक्रम, श्री प्रमोद पाटील यांच्या सहकार्याने व प्रयत्नातून करण्यात आला .
या कार्यक्रमास श्री.डॉ. विजय ठक्कर, श्री.कमलाकर भोईर, चंद्रकांत पाटील सरपंच मलवाडा, श्री,अनिल पाटील, मिलींद महाकाल, मलवाडा चे उपसरपंच श्याम व आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थितीत होते.

Previous articleजिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना नवनाथ जगताप यांनी शपथ देऊन केला दक्षता जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ
Next articleऐन दिवाळीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे सावट, कालपासून संप पुकारला
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here