Home पुणे पिंपरी-चिंचवड, पुणे महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी शरद पवार मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी…

पिंपरी-चिंचवड, पुणे महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी शरद पवार मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी…

260
0

राजेंद्र पाटील राऊत

पुणे :  ( उमेश पाटील प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- पुणे महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. मात्र, पुण्यासारखी महत्वाची महापालिका काबिज करण्यासाठी राष्ट्रवादीकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.राज्यात आगामी माहापालिका निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झालीय. अशावेळी पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झालीय. स्वत: महापालिकेसाठी शरद पवार मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे.

पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये नुकताच पदाधिकारी मेळावा घेतलाय. त्यानंतर आता पुणे महापालिकेसाठी दिवाळीनंतर पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. येत्या महापालिका निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवणार, असा निर्धार राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला. आगामी पुणे महापालिका निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर होईल, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून खुद्द शरद पवार मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. पवार यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत रणशिंग फुंकलं आहे. त्यावेळी त्यांनी ज्या पक्षाने शहराची उभारणी केली, त्या पक्षाला पुन्हा निवडून देण्याचं आवाहन पवारांनी केलंय. तर दुसरीकडे भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहे. भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी थेट विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या चुकांची यादीच दिलीय.

शरद पवार यांच्या उपस्थितीत दिवाळीनंतर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक होणार आहे. त्याबाबत पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माहिती दिली आहे.

सत्ताधारी भाजपच्या कामावरती पुणेकरांमध्ये असंतोष आहे. पुणेकर आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवतील. अजित पवारांच्या नेतृत्वात महापालिका जिंकू असा विश्वास शहराध्यक्ष जगताप यांनी व्यक्त केला. पुणे महापालिकेत एकूण 164 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. त्यापैकी भाजपकडे सर्वाधिक 99 नगरसेवक आहेत. तर राष्ट्रवादी 44, काँग्रेस 9 आणि शिवसेनेकडे 9 जागांचं बळ आहे.या बैठकीत आजी माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे दिवाळीनंतरची राष्ट्रवादीची ही बैठक महत्वाची ठरण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here