Home मुंबई टोपे साहेबांनी पुन्हा विद्यार्थीना टोपी घातली ! न्यासा’वर मेहेरनजर का? आरोग्य विभाग...

टोपे साहेबांनी पुन्हा विद्यार्थीना टोपी घातली ! न्यासा’वर मेहेरनजर का? आरोग्य विभाग भरतीt पुन्हा गोंधळ….

133
0

राजेंद्र पाटील राऊत

टोपे साहेबांनी पुन्हा विद्यार्थीना टोपी घातली !
न्यासा’वर मेहेरनजर का? आरोग्य विभाग भरतीt पुन्हा गोंधळ….

ठाणे (अंकुश पवार, सहसंपादक ठाणे, युवा मराठा वेब न्युज चॅनेल)

आरोग्य विभागांतर्गत वर्ग ‘क’ आणि ‘ड’ वर्गाच्या परीक्षा घेण्याची जबाबदारी दिल्लीतील न्यासा कम्युनिकेशन्स कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. ही कंपनी निविदा प्रक्रियेतून निवडण्यात आली असून, गेल्या महिन्यात या परीक्षा होणार होत्या. मात्र, गेल्या महिन्यात न्यासाने पुरेशी परीक्षा केंद्रे उपलब्ध करून न दिल्यामुळे ऐनवेळी आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यावेळी परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माफी मागितली होती. त्यानंतर २४ ऑक्टोबर आणि ३१ ऑक्टोबर अशा दोन दिवशी या परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. पुन्हा कोणताही गोंधळ होऊ नये आणि परीक्षा यशस्वी व्हावी, यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह संपूर्ण आरोग्य विभागाने कंबर कसली होती.
आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेतील गोंधळ प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशीही कायम राहिला. विभागाच्या ‘क’ गटातील पदांसाठी रविवारी झालेल्या परीक्षेत मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह राज्यातील अनेक ठिकाणी प्रश्नपत्रिका मिळण्यात विलंब, चुकीच्या पदाच्या प्रश्नपत्रिका, असा ढिसाळ नियोजनाचा अनुभव विद्यार्थ्यांना आला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घोळानंतर परीक्षेच्या दिवशीही गोंधळ झाल्याने उमेदवारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल.

रविवारी एकूण १७ जिल्ह्यांतील १०२५ केंद्रांवर ५२ संर्वगात या परीक्षा घेण्यात आल्या. सकाळच्या सत्रात २३८ ठिकाणी तर दुपारच्या सत्रात ७८७ ठिकाणी परीक्षा घेण्यात आल्या. मुंबईतील साकीनाका, कोल्हापूर आणि पुणे येथे प्रश्नपत्रिका फुटल्याच्या तक्रारी होत्या तर नाशिक व पुण्यातील पिंपरी- चिंचवड येथे प्रश्नपत्रिका वेळेत पोहोचल्या नाहीत. आठ ठिकाणी प्रश्नपत्रिका असलेल्या पेटीचे डिजिटल लॉक न उघडल्यामुळे पेटीचे लॉक कापून ते उघडावे लागले. काही ठिकाणी न्यासाचे परीक्षा पर्यवेक्षक न पोहोचल्याने ऐनवेळी आरोग्य विभागाला पर्यवेक्षक द्यावे लागले. या गोंधळात परीक्षा उशिराने सुरु झाल्या.
टोपे साहेब तुम्हाला परीक्षा नियोजन नाही जमत तर एमपीएससी कडे ह्या परीक्षा द्या असे वारंवार निवेदन देऊन सुधा आपला न्यासा’ कंपनीला परीक्षा देण्याच्या हट्ट का ?

पुन्हा एकदा आरोग्य विभाग भरती ही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे,पुढील परीक्षा सुधा असाचा प्रकारे होणार का हा प्रश्न विद्यार्थीना पडला आहे.

Previous articleसटाणा -देवळा रस्त्यावर अपघात दुचाकीस्वाराला कट मारुन केले जखमी
Next articleपिंपरी-चिंचवड, पुणे महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी शरद पवार मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here