Home माझं गाव माझं गा-हाणं रिपाई (आ) च्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध निवेदन मा.जिल्हाधिकारी, पालघर यांच्या...

रिपाई (आ) च्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध निवेदन मा.जिल्हाधिकारी, पालघर यांच्या मार्फत शासनाला देण्यात आले.

208
0

राजेंद्र पाटील राऊत

रिपाई (आ) च्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध निवेदन मा.जिल्हाधिकारी, पालघर यांच्या मार्फत शासनाला देण्यात आले.                                                                    पालघर,(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)

दोन दिवसापासून महाराष्ट्रात महविकास आघाडी सरकारच्या विरोधात विविध ठिकाणी मा.ना. रामदासजी आठवले साहेब , सामाजिक न्याय राज्यमंत्री
(भारत सरकार) यांच्या आदेशानुसार आंदोलन होत असताना पालघर जिल्ह्यात सुध्दा जिल्हाध्यक्ष आयु.सुरेश जाधव
यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारचा निषेध करून वरील निवेदन मा.जिल्हाधिकारी, पालघर यांच्या मार्फत शासनाला देण्यात आले.
१) महाराष्ट्रात अनेक महिलांवरील अन्याय-अत्याचार थांबले पाहिजेत व आरोपींना तात्काळ कठोरात-कठोर शिक्षा झाली पाहिजे. सरकारने महिलांना संरक्षण दिले पाहिजे.
२) त्री सदस्य प्रभाग रचना रद्द करून प्रभाग १ सदस्य रचना अमलात आणावी.
३) ओ.बी.सी. समाजाचे आरक्षण उर्वरित सुरू ठेवावे.
४) मराठा समाजाला त्वरित आरक्षण मिळाले पाहिजे.
५) महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजाराची मदत मिळावी.
६) दलितांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कडक अमलबजावणी झाली पाहिजे.
या मागणीचे निवेदन दिनांक २१ ऑक्टोंबर २०२१रोजी मा.जिल्हाधिकारी पालघर यांना देण्यात आले त्या समयी पालघर जिल्हाध्यक्ष आयु. सुरेश जाधव , कार्याध्यक्ष सचिन लोखंडे , उपाध्यक्ष कुंदन मोरे , तालुका अध्यक्ष नरेंद्र करनकाळे , युवा तालुका अध्यक्ष शरद जाधव , युवा कार्यकर्ता संकेत वरठा , रवि सोलंकी , समिधा दुमाडा , पालघर शहर उपाध्यक्ष राम ठाकूर , पालघर शहर संघटक राजू शेख , सचिन घाडीगावकर , पिलेना शाखा अध्यक्ष शाहरुख शेख , तालुका युवा उपाध्यक्ष जागृत जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleकुणी घर देता का घर! ; टाळेबंदीनंतर बेघरांच्या संख्येत वाढ.
Next articleबुलढाणा जिल्ह्यात बचत गटाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here