Home विदर्भ एका शाळेत दारू-मटनाची पार्टी, दुसऱ्या शाळेत कंडोमची पाकिटे!; संग्रामपूर तालुक्‍यातील अनोखी “शाळा’;...

एका शाळेत दारू-मटनाची पार्टी, दुसऱ्या शाळेत कंडोमची पाकिटे!; संग्रामपूर तालुक्‍यातील अनोखी “शाळा’; तीन शिक्षक निलंबित

184
0

राजेंद्र पाटील राऊत

एका शाळेत दारू-मटनाची पार्टी, दुसऱ्या शाळेत कंडोमची पाकिटे!; संग्रामपूर तालुक्‍यातील अनोखी “शाळा’; तीन शिक्षक निलंबित

ब्यूरो चीफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज

विद्येचे पवित्र मंदिर असलेल्या शाळेतच दारू- मटणाची ओली पार्टी करणाऱ्या दोन शिक्षकांना जिल्हा परिषदेच्‍या शिक्षण विभागाने निलंबित केले आहे. यासोबतच दुसऱ्या एका जिल्हा परिषद शाळेच्या आवारात कंडोमच्या पाकिटांचा कचरा आढळल्याने शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे. संग्रामपूर तालुक्यातील हडियामहाल आणि शिवनी येथील शाळेतील शिक्षकांवर काल, १७ सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली आहे.

संग्रामपूर तालुक्यातील हडियामहाल येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात कंडोमची पाकिटे आढळली होती. त्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक इरफान सुरत्ने यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात त्यांना बुलडाणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या एका शाळेत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संग्रामपूर तालुक्यातीलच शिवनी येथील जिल्हा परिषद शाळेत मद्य प्राशन करून शिक्षकांनी मटणाची पार्टी केली. या शाळेतील सहाय्यक अध्यापक मनोज ठोंबरे यांचे निलंबन करून त्यांना निलंबन काळात मेहकर पंचायत समिती अंतर्गत बेलगाव येथील शाळेत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याच शाळेतील दुसरे शिक्षक शांताराम चव्हाण यांचे निलंबन करून त्यांना निलंबन काळात लोणार पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गायखेड येथील शाळेत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दोन्ही घटनेचे व्हिडिओ शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते. व्हिडिओची सत्यता तपासून ही कारवाई करण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सांगितले.

Previous articleग्रामीण रूग्णालय, वरवट बकाल रूग्णालय
Next articleआमदार संजय कुटेंचा मंत्रालयात तीन तास ठिय्या आंदोलन!; अधिकाऱ्यांनी रिक्वेस्‍ट केली तेव्‍हा म्हणाले, १५ दिवसांत निर्णय झाला नाही तर सोळावा दिवस माझा!! –
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here