Home मुंबई ठाणे : पालकमंत्र्यांच्या घराजवळील रस्त्यावर धूळफेक’ : डांबरीकरण १६ तासांत रस्ते उखडले

ठाणे : पालकमंत्र्यांच्या घराजवळील रस्त्यावर धूळफेक’ : डांबरीकरण १६ तासांत रस्ते उखडले

154
0

राजेंद्र पाटील राऊत

ठाणे : पालकमंत्र्यांच्या घराजवळील रस्त्यावर धूळफेक’ : डांबरीकरण १६ तासांत रस्ते उखडले

ठाणे : (अंकुश पवार, ठाणे शहर प्रतिनिधी, युवा मराठा न्युज नेटवर्क)

ठाणे महापालिका मुख्यालय आणि पालकमंत्र्यांच्या घराजवळील रस्ते अवघ्या काही तासांत पुन्हा उखडल्याने
ठेकेदारांनी केलेली धूळफेक उघडकीस आली आहे. नितिन कंपनीजवळील रामचंद्र नगरला जाणाऱ्या सेवा
रस्त्यावरही खड्डे पडले आहेत. खड्डयांमुळे या मार्गावरील वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता. या
रस्त्यापासून जवळच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा बंगला आहे.
यावेळी पालिकेचे अधिकारी आणि खड्डे बुजवण्याचा ठेका घेतलेले बिटकॉईन कंपनीचे कर्मचारीही उपस्थित
होते. मात्र पाणी,चिखल काढण्याचे कष्ट न घेण्यात आल्याने अवघ्या १६ तासांमध्ये या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले.
पालिकेचे अधिकारी आणि ठेकेदाराच्या संगनमताने दुरुस्तीच्या नावाखाली ठाणेकरांचा पैसा खड्ड्यात घालण्यात
येत असल्याचा आरोप केला आता होत आहे. याप्रकरणी पालिका अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश
पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here