Home Breaking News  मुंबई – हैदराबाद बुलेट ट्रेनमध्ये पुणे जिल्ह्यातील हवेलीपासून इंदापूरपर्यंत ४५ गावे होणार...

 मुंबई – हैदराबाद बुलेट ट्रेनमध्ये पुणे जिल्ह्यातील हवेलीपासून इंदापूरपर्यंत ४५ गावे होणार बाधित 

132
0

मुंबई – हैदराबाद बुलेट ट्रेनमध्ये पुणे जिल्ह्यातील हवेलीपासून इंदापूरपर्यंत ४५ गावे होणार बाधित
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

बारामती ⭕: केंद्र सरकारच्या अतिमहत्वाकांक्षी मुंबई- हैदराबाद हायस्पीड बुलेट ट्रेनच्या कामाने आता वेग धरला असून गावागावात सामाजिक सर्वेक्षणे सुरू आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा या तीन राज्यांतील ७०० किलोमीटर अंतरातील हजारो गावे यामध्ये बाधित होणार आहेत. एकट्या पुणे जिल्ह्यातील ४५ गावांना या प्रकल्पाचा फटका बसू शकतो किंवा या ४५ गावांमध्ये या मार्गासाठी भूसंपादन होऊ शकते.
ही रेल्वे सोलापूर जिल्ह्यातही अनेक गावांना बाधित करणार आहे. या ठिकाणीही सर्वेक्षणास सुरवात करण्यात आली आहे. हे सामाजिक सर्वेक्षण दोन महिन्यांच्या आत उरकण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले असून पुढील महिन्यापासून नव्याने या भूसंपादनाच्या पहिल्या टप्प्यास सुरवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात आतापर्यंतच्या टप्प्यात शासकीय विभागांना यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेले नाही हे विशेष!
या प्रकल्पातून ज्या गावांमधून रेल्वे जाणार आहे, किंवा ज्या गावांमधील जमीन संपादित होऊ शकते, अशा प्राथमिक टप्प्यातील अंदाजित गावांची यादी पुढीलप्रमाणे –

हवेली – लोहगाव, वाघोली, मांजरी खुर्द, मांजरी बुद्रुक, शेवाळवाडी, फुरसुंगी, कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर, रामोशीवाडी, आळंदीम्हातोबाची, तरडे, वळती, शिंदवणे.

पुरंदर तालुका – वाघापूर, आंबळे, ताकवडी, माळशिरस, राजूरी, पिसे, दौंड तालुका – खोर, पडवी.

बारामती तालुका – वढाणे, दंडवाडी, नारोळी, कोळोली, कारखेल, खराडेवाडी, उंडवडी सुपे, साबळेवाडी, जरेवाडी, गाडीखेलवाडी, कटफळ, सावळ, काटेवाडी

इंदापूर – लाकडी, निंबोडी, सणसर, जाचकवस्ती, बेलवाडी, थोरातवाडी, कर्दनवाडी, परिटवस्ती, कळंब, निमसाखर, खोरोची, बोराटवाडी, चाकाटी, ⭕

Previous articleनांदेडमध्ये पुन्हा एकदा गोळीबार “आधी गोळीबार, मग तलवारीने वार करून (गुंंडाचा) खून
Next articleनानाजी देशमुख कृषी संजीवनी ( पोखरा ) योजने अंतर्गत धनज येथे लोक सहभागीय सूक्ष्म नियोजन कार्यक्रम संपन्न…..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here