चंदनपुरीत शिक्षण क्षेत्रच नासवले,
हैवान रवि महालेला अटक केले…!!
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगांव– उतर महाराष्ट्रात सुपरचित असलेल्या व खंडेराव महाराजांच्या धार्मिक स्थळामुळे ख्यातीप्राप्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदनपुरी गावात काल हैवानालाही लाजवेल अशी एक घटना घडली.त्यामुळे पवित्र ज्ञानदानाचे कार्य करणारे शिक्षण क्षेत्र कलंकीत झाल्याने मोठ्ठीच खळबळ उडाली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील मालेगांव जवळील चंदनपुरी हे धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून जरी नावलौकिक प्राप्त असले तरी अशा या गावात कै.बुवाजी रामभाऊ पाटील यांनी भविष्याची ओळख लक्षात घेऊन येथे शिक्षण संस्थेची स्थापना केली.आणि त्याव्दारे चंदनपुरीत विद्यालय चालवून चंदनपुरी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करुन दिली.मात्र चांगल्या विचारांनी सुरु झालेल्या या विद्यालयाची सध्याची सुत्रे सतिश बुवाजी पाटील या संस्थाचालकाकडे असून,सध्या या संस्थेत अनागोंदी व बेंबदशाही सुरु आहे,कुणावरच संस्थाचालकाचा अंकूश व वचक नसल्यामुळे कालच दुर्दैवी व पशूलाही लाजवेल अशी घटना घडली.त्यामुळे या शिक्षण संस्थेची सर्वत्र छि थू होत असून,आदर्श म्हणून कामगिरी करणाऱ्या बुवाजी रामभाऊ पाटील व अस्मिता दिघावकर यांचे या विद्यालयाला देण्यात आलेले नाव या अश्लाघ्य कृत्यामुळे मलिन झाले असून हैवान रवि महाले याने केलेल्या कृत्यांमुळे काळीमा फासला गेला आहे.
शुक्रवार दिनांक १६ जुलै २०२१ रोजी गावातीलच एक अल्पवयीन मुलगी या संस्थेच्या शाळेत शिकायला आलेली असताना सगळे विद्यार्थी घरी निघून गेल्यावर हैवान रवि महाले सदरच्या अल्पवयीन मुलीच्या कमरेत टाकून तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला व तिची छेडछाड करुन विनयभंग केला.या घटनेची माहिती सदर अल्पवयीन विद्यार्थ्यांनीने घरी आल्यावर सांगताच तिच्या पालकांसह संपूर्ण चंदनपुरी गावात तीव्र संतापाची लाट उसळली.अखेर त्या अल्पवयीन मुलीच्या पालकांनी मुलीला सोबत नेऊन मालेगांवच्या किल्ला पोलिस स्टेशनला संशयित आरोपी रवि महाले या हैवानाविरुध्द पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.किल्ला पोलिसांनी तपासाची सुत्रे तात्काळ फिरवीत संशयित आरोपी रवि महाले यास अटक केली.या घटनेचा तपास पी.एस.आय ढाकणे हे करीत आहेत.दरम्यान चंदनपुरीतल्या या विद्यालयात यापुर्वीही अशाच स्वरुपाचे प्रकार घडलेले असून स्थानिक गावकरीच्या मध्यस्थीने ते गावातच मिटविण्यात आल्याची चर्चाही यावेळी दबक्या आवाजात ऐकायला मिळाली.
थोड्याच वेळात👉व्हिडीओ न्युज फक्त युवा मराठा न्युजवर सविस्तर वृतांत