Home Breaking News “कोरोना योद्धे, पोलीस अंमलदार किरण तेलंगे यांना सानुग्रह अनुदाना अंतर्गत ६० लाखांचा...

“कोरोना योद्धे, पोलीस अंमलदार किरण तेलंगे यांना सानुग्रह अनुदाना अंतर्गत ६० लाखांचा धनादेश मंजुर – पोलीस अधीक्षक श्रीप्रमोदकुमार शेवाळेंच्या हस्ते कुटूंबियांना सुपूर्द

162
0

कोरोना आजाराने मृत्यू पावलेल्या
“कोरोना योद्धे, पोलीस अंमलदार किरण तेलंगे यांना सानुग्रह अनुदाना अंतर्गत ६० लाखांचा धनादेश मंजुर – पोलीस अधीक्षक श्रीप्रमोदकुमार शेवाळेंच्या हस्ते कुटूंबियांना सुपूर्द

नांदेड प्रतिनिधी / राजेशNभांगे

कोरोना काळात पोलीस ठाणे मुदखेड येथील पोलीस अंमलदार किरण ईरबाजी तेलंगे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटूंबियांना ६० लाख रुपयांचा धनादेश पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी किरण तेलंगे यांच्या कुटूंबियांना आज दि.९ जुलै रोजी दिला.
दि.२० डिसेंबर २०२० रोजी मुदखेड पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार किरण ईरबाजी तेलंगे (बकल नंबर २२०८) यांचा कोरोना आजाराने मृत्यू झाला होता.
पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठविलेल्या सानुग्रह अनुदानाच्या शिफारसीला त्यांनी मंजुर केले.

आज दि.९ जुलै रोजी मनिषा किरण तेलंगे, त्यांची दोन मुले ऋतुराज आणि कृृष्णकांत यांना प्रत्येकी २० लाख रुपये असा एकूण ६० लाख रुपयांचा धनादेश पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी त्यांना दिला.
कोरोना काळात सुध्दा आपल्या कर्तव्यात कसुर न ठेवता किरण तेलंगे यांनी आपले काम हिंमतीने केले. पण दुर्देवाने त्यांचा जीव गेला.
किरण तेलंगे यांची एकूण सेवा २६ वर्ष झाली होती. याप्रसंगी पोलीस अधिक्षकांनी तेलंगे कुटूंबियांना भविष्यातील कोणत्याही अडचणींना मदत करू असे आश्वासन दिले. याप्रसंगी पोलीस कल्यण विभागाचे सहाय्यक, पोलीस निरिक्षक शिवप्रकाश मुळे, जनसंपर्क अधिकारी शिवाजी लष्करे, चौधरी यांनी सुध्दा तेलंगे कुटूंबियांची संवाद साधून त्यांना धीर दिला.

Previous articleदेगलूर – बिलोली विधानसभा मतदारसंघातील २०८ कोटींची रस्ते सुधारणा कामे मंजूर
Next articleजिल्हा परिषद शाळा पालेखुर्द ला मिळाली नवसंजीवनी ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे आनंददायी वातावरण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here