Home नांदेड मुखेड तालुक्यातील सलगरा बु.परिसरातील इंद भारत कंपनीजवळ वऱ्हाडी आयचर टेम्पो चा मोठा...

मुखेड तालुक्यातील सलगरा बु.परिसरातील इंद भारत कंपनीजवळ वऱ्हाडी आयचर टेम्पो चा मोठा अपघात

378
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील सलगरा बु.परिसरातील इंद भारत कंपनीजवळ वऱ्हाडी आयचर टेम्पो चा मोठा अपघात

अपघातात १ जागीच ठार,३१ गंभीर तर ४ अति गंभीर अवस्थेत
संग्रामपाटील तांदळीकर मुखेड तालुका शहर प्रतिनिधी

मुखेड तालुक्यातील मुखेड – नांदेड महामार्गावर असलेल्या सलगरा (बु) परिसरातील इंद भारत कंपनी (विज निर्मिती प्रकल्प) जवळ दि.१५ जुन २०२१ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास वऱ्हाडाचा आयचर टेम्पो गाडी क्रं. एम.एच.०४ ई.बि.३५२५ या क्रंमाकाचे आयचर टेम्पो पलटी होवून प्रशांत जनार्दन सुर्यवंशी, वय २२ वर्ष हा जागीच ठार झाला असून ४ अतिगंभीर तर इतर ३१ जन गंभीर अवस्थेत आहेत.
घटनेचे सविस्तर वृत असे की,उदगीर तालुक्यातील हाळी येथील वर मंडळीचे व-हाड बिलोली तालुक्यातील कार्ला येथे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने सदर टेम्पो रस्त्या वर पलटी होवून हा अपघात झाला.या अपघातात टेम्पो १० मिटर घसरत गेला. या घटनेची माहीती कळताच मुखेड शहरातील उपजिल्हा रुग्नालयातीचे डॉ अनंत पाटील, डॉ उमेश गायकवाड, डॉ देवकत्ते मॅडम,सिस्टर फतेलसकर,सिस्टर गिनेवाड,सिस्टर पांचाळ, सिस्टर यमलवाड, सिस्टर गायकवाड, सिस्टर केंद्रे, ब्रदर योगेश पावरा, ब्रदर संजय वळवी, ब्रदर संजय पावरा,ब्रदर धुळे,ब्रदर बादल रिंदकवाले, ब्रदर होळकर, ब्रदर आदेश राठोड, शंकर गायकवाड,प्रशांत बनसोडे, लखन गायकवाड,पाये मामा, वडजे मामा, लोणे मामा, रवि गायकवाड,बेळगे मामा सह
डॉक्टर,सिस्टर, ब्रदर,वार्ड बॉय,सर्वांनी पटापट मानवतेच्या दृष्टिकोनातून बिना ग्लोज मास्कचा वापर करता आपघातातील जखमींना आधार दिला, समज दिला, प्रथमोपचार करुन २५ अति गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात पाठवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here