Home नांदेड राजुरा बु. येथून देगलूर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पुलाची झाली दुरवस्था.

राजुरा बु. येथून देगलूर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पुलाची झाली दुरवस्था.

146
0

राजेंद्र पाटील राऊत

राजुरा बु. येथून देगलूर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पुलाची झाली दुरवस्था.

मुखेड प्रतिनिधी (मनोज बिरादार) राजुरा बु येथून जवळच असणाऱ्या देगलूर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील राजुरा बु.या परिसरातील असलेल्या ओढ्यावरील पुलाची अत्यंत दुर्दशा झाली असून सार्वजनिक बांधकाम विभाग देगलूर अंतर्गत पुलाचा बांधकाम निधी मंजूर झाला असून गेल्या 3 वर्षांपासून लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार केली असता पुलाची दखल न घेता फक्त त्याची पाहणी करून दिलेल्या आश्वासनाची आजतागायत पूर्तता झालेली नाही.हा अनेक खेड्याना देगलूर शी जोडणारा एकमेव मुख्य रस्ता असून मागील 3 वर्षांपासून त्यावरून पावसाळ्यात वाहतूक करताना प्रवाश्यांना जीव मुठीत घेऊन वाटचाल करावी लागते. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न लागल्यास एखादी दुर्घटना सुद्धा घडू शकते यास जबाबदार कोण? परिसरातील नागरिकांचा कामाबद्दल असंतोष दिसत असून ह्या परिसरातील कुणीही लोकप्रतिनिधी अथवा जिल्हापरिषद सदस्य ह्याची दखल घ्यायला तयार नाहीत. विभागातील सर्व अधिकारी झोपेचे सोंग घेऊन बसले आहेत
तरी त्यांना योग्य ती सूचना देऊन आम्हाला होत असलेल्या अडचणींला दूर करून संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष घालून सहकार्य करावे अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Previous articleमुखेड तालुक्यातील सलगरा बु.परिसरातील इंद भारत कंपनीजवळ वऱ्हाडी आयचर टेम्पो चा मोठा अपघात
Next articleब्रिटनमध्ये सापडला नवीन विषाणू:मंकीपॉक्स
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here