Home पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील लहान मुलांसाठीचे सर्वात पहिले कोविड केअर सेंटर.. 

पश्चिम महाराष्ट्रातील लहान मुलांसाठीचे सर्वात पहिले कोविड केअर सेंटर.. 

843
0

राजेंद्र पाटील राऊत

पश्चिम महाराष्ट्रातील लहान मुलांसाठीचे सर्वात पहिले कोविड केअर सेंटर..
युवा मराठा नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

हातकणंगले तालुक्यातील माणगांव गावातील ए. पी. मगदुम हायस्कूल, माणगांव येथे कोल्हापूर जिल्यातील लहान मुलांसाठीचे सर्वात पहिले कोविड केअर सेंटर चालू होत आहे. माणगांव गावातील ग्रामस्थांसाठी व परिसरातील गरजू लोकांसाठी माणगांव ग्रामपंचायतीच्या वतीने 10 ऑक्सिजन बेड सहित 35 बेडचे कोविड केअर सेंटर व लहान मुलांचे 15 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. या कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.

या उद्घाटनप्रसंगी माजी खासदार राजू शेट्टी, माणगांवचे सरपंच राजू मगदूम, जिल्हा परिषद सदस्या सौ. वंदना मगदूम , जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषद CEO संजयसिंग चव्हाण, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसिलदार शरद पाटील, BDO शबाना मोकाशी, हातकणंगले पोलीस निरीक्षक के.एन. पाटील, जवाहर कारखाना संचालक जिनगोंडा पाटील, नगराध्यक्ष डॉ. निता माने, उपसरपंच अख्तरहुसेन भालदार, मुख्याध्यापिका एम.व्ही. कदम, अनिल पाटील, आय. वाय. मुल्ला (सर) यांच्यासह सर्व ग्रा.प सदस्य , आरोग्य केंद्रातील आशा सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here